spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तुम्हाला घनदाट केस आवडतात ? तर या टिप्स तुमच्यासाठी…

सर्वांनाच घनदाट केस पाहिजे असतात . घनदाट केसांसाठी आपण बरेच उपाय करतोय . केस जर चांगली असतील तर आपल्याला वेगवेगळी हेअरस्टाईल करता येते . जर केस लांब आणि घनदाट असतील तर आपले नैसर्गिक सौंदर्य फुलून दिसते . स्त्रियांना केसांच्या समस्या भरपूर असतात . जसे की केस गळणे , पातळ होणे , केस न वाढणे , इत्यादी समस्या असतात . अशावेळी आपण अनेक औषध उपचार करतो पण त्यांनी काही फरक पडत नाही . त्यामुळे घनदाट केसांसाठी काही सोप्या टिप्स वापरल्या पाहिजे .

हे ही वाचा : मलेरिया झाल्यास चुकूनही ‘या’ गोष्टी खाऊ नका

 

धूळ , घाण , तेलकट यामुळे केस खराब होतात . त्यामुळे केस वाढती कमी होते . केस जास्त प्रमाणात तेलकट असतील तर त्यामुळे केसांमध्ये कोंडा आणि उवा किंवा जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांना दुर्गंधी देखील येते .

आपण केस धुण्यासाठी शॅम्पू किंवा कंडिशनर वापरतो . हे वापरल्यास केस चांगली धुवून आणि पुसून घ्या . काहीवेळा आपण केस चांगली धुवत नाही आणि पुसत देखील नाही . त्यामुळे केसांमधील पाणी तसेच राहते . त्यासाठी केस चांगली धुतली पाहिजे .

केस घनदाट आणि वाढण्यासाठी आपण केसांची चांगली मालिश केली पाहिजे . त्यासाठी आपण खोबरे तेल , बदाम तेल किंवा आवळ्याचे तेल देखील वापरू शकतो . केसांना तेलाची मालिश केल्यानी केस घनदाट आणि निरोगी राहतात .

 

बाजारात केस वाढण्यासाठी काही प्रॉडक्ट उपलब्द आहे . तर ते देखील तुम्ही वापरू शकता . पण काही प्रोडक्ट महाग आणि केमिकलयुक्त असतात . त्यामुळे तुम्हाला जी प्रॉडक्ट तुमच्या बजेट मध्ये येतील तीच तुम्ही वापरा .

केस वाढीसाठी तुम्ही कांद्याचा रस देखील लावू शकता . केसांच्या वाढीसाठी तुम्ही सफरचंद सायडर व्हिनेगर वापरु शकता. यामुळे केसांना चांगली चमक येते.

केसांच्या मुळांपासून तेल लावणे तसेच टाळूला देखील तेलाची मालिश करणे .

केस वाढीसाठी आणि घनदाट होण्यासाठी तुम्ही एरंडेल तेल देखील वापरू शकता . यामुळे केस घनदाट होतात .

हे ही वाचा : 

थायरॉईड नियंत्रणात आण्यासाठी घरगुती उपाय

 

Latest Posts

Don't Miss