तुम्हाला रात्री अचानक जाग येते ?, तर पहा त्याची करणे

तुम्हाला रात्री अचानक जाग येते ?, तर पहा त्याची करणे

तुम्ही अनेक वेळा अनुभवलं असेलच की तुम्ही जेव्हा दिवसभर कामात असता आणि रात्री थकून भागून जेव्हा बेडवर जाता, त्यावेळेस तुम्हाला एकदम शांत झोप लागते. पण जेव्हा तुम्हाला सुट्टी असते किंवा तुम्ही जास्त थकलेले नसता त्यावेळेस तुम्ही नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरा झोपता. पण जेव्हा तुम्ही रात्री गाढ झोपलेले असता आणि अचानक मध्य रात्री तुम्हाला अचानक जाग येते. असे तुमच्या बरोबर सतत घडत राहील तर त्यामागील अनेक करणे असू शकतात. आम्ही तुम्हाला रात्री अचानक जाग येण्यामागील काही कारण सांगणार आहोत.

जर तुम्हाला रात्री झोपे दरम्यान काहीच समस्या नसेल आणि अचानक जर तुम्हाला मध्यरात्री जाग येत असेल तर तुम्हाला चिंता किंवा नैराश्य असेल , पोटाची समस्या , मद्यपान , ही तुम्हाला रात्री अचानक जाग येण्यामागे काही कारणे असू शकतात .

चिंता (Tension): तणावामुळे व्यक्तीचे झोपणे कठीण होऊ शकते यालाच निद्रानाश असेही म्हणतात. पण चिंतेमुळे तुम्हाला मध्यरात्री जाग येऊ शकते आणि परत झोपायला त्रास होऊ शकतो यालाच मध्यम निद्रानाश असे देखील म्हणतात. टर्मिनल निद्रानाश म्हणजेच जर तुम्ही तुमच्या सामान्य उठण्याच्या वेळेपेक्षा अगोदर उठत असाल तर ते तुम्हाला असलेल्या नैराश्याचे आणि चिंतेचे कारण असू शकते.

पोटाचा त्रास (Stomach Problem): ऍसिडिटीमुळे देखील तुम्हाला रात्री उलटीचा होईल असे वाटते आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते किंवा खूप भूक लागल्याने किंवा खूप पोट भरल्याने रात्रीच्या वेळी जागरण होऊ शकते.

मद्यपान (Drinking): जर तुम्ही मद्यपान केले असेल तर अल्कोहोल तुमच्या झोपेच्या टप्प्यांवर विविध प्रकारे परिणाम करू शकत. म्हणजेच असे आढळले आहे की मद्यपानामुळे रात्रीच्या उत्तरार्धात नेहमीपेक्षा पहिला टप्प्याच्या अधिक झोपेशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, स्टेज १ स्लीप हा कालावधी आहे ज्यामध्ये तुम्ही पर्यावरणीय घटकांमुळे जागे होण्याची शक्यता असते.म्हणूनच तुम्ही रात्री झोपण्या अगोदर जास्त प्रमाणात मद्यपान केले असेल तर तुम्हाला रात्री अचानक जाग येऊ शकते.

हे ही वाचा:

श्रीकांत आडकरांनी वयाच्या ७८ वर्षी जिंकली पॉवर लिफ्टिंग स्पर्धा

दक्षिण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का, प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुनील बाबू यांचे आकस्मिक मृत्यू

जेंटलमॅन आहे, याचं सर्टीफिकेट यांच्याकडून घ्यावं लागेल का, आव्हाडांचा बावनकुळेंना सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version