spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तुमच्या मुलांना कुष्ठरोगाची समस्या आहे? तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

कुष्ठरोग किंवा हॅन्सन रोग पूर्वी इतका पसरलेला नाही परंतु जगाच्या अनेक भागांमध्ये अजूनही अस्तित्वात आहे. जगभरात सुमारे २,०८,००० लोकांना कुष्ठरोग आहे आणि अशी बहुतेक प्रकरणे आशिया आणि आफ्रिका खंडात आढळतात.

कुष्ठरोग किंवा हॅन्सन रोग पूर्वी इतका पसरलेला नाही परंतु जगाच्या अनेक भागांमध्ये अजूनही अस्तित्वात आहे. जगभरात सुमारे २,०८,००० लोकांना कुष्ठरोग आहे आणि अशी बहुतेक प्रकरणे आशिया आणि आफ्रिका खंडात आढळतात. कुष्ठरोग(leprosy) हा मायकोबॅक्टेरियम लेप्री (Mycobacterium leprae) या जीवाणूमुळे होणारा एक प्राचीन संसर्गजन्य रोग आहे आणि तो प्रामुख्याने त्वचा आणि नसा, डोळे आणि वरच्या श्वसनमार्गाच्या,त्वचेला प्रभावित करतो. यावर कोणतेही उपचार न केल्यास अपंगत्व येऊ शकते, प्रत्येकाला असे वाटत असते कि कुष्ठरोग हा आजार बारा होत नाही, तर असे नाही आहे. कुष्ठरोगाचे निदान आणि उपचाराने हा आजार बरा होऊ शकतो. कुष्ठरोगामुळे स्नायू कमकुवत होणे किंवा अर्धांगवायू, नसा वाढणे आणि डोळ्यांच्या समस्या यामुळे अंधत्व येऊ शकते.

  • व्हिटॅमिन ए (Vitamin A ) तोंड, पोट, आतडे आणि श्वसन या प्रक्रियेत त्वचेच्या ऊतींचे संरक्षण करते आणि त्यांना निरोगी ठेवते. गाजर, पपई, रताळे या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणावर आढळते.
  • व्हिटॅमिन सी (Vitamin C) अँटीबॉडी फंमशनच्या उत्तेजनास प्रेरणा देते, सेल्युलर फॅमशन्सना समर्थन देते, हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे कुष्ठरोग बारा होण्यास मदत करते. यासाठी आहारात आंबट पदार्थ फळे जसे आवळा, संत्री, गोड लिंबू, द्राक्ष फळे, लिंबू, टोमॅटो इ.पदार्थांचे सेवन करावे.
  • व्हिटॅमिन डी (Vitamin D) ह चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे यामध्ये असते, त्याचा प्रतिजैविक प्रभाव असतो, त्यामुळे कुष्ठरोगाचा संसर्ग नियंत्रित होण्यास आणि हळू हळू कमी होण्यास मदत होते.त्यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकासहाच शेक घ्यावा , अंडी, मशरूम, फोर्टिफाइड दूध यांचे सेवन करावे.

  • व्हिटॅमिन ई (Vitamin E) अँटिऑक्सिडंट आणि रॅडिकल स्कॅव्हेंजर (Radical scavenger) म्हणून काम करतेआणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. याचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात सूर्यफुलाच्या बिया, अंबाडीच्या बिया, बदाम आणि पिस्त्यासारखे नट खावे.
  • व्हिटॅमिन बी१२ (Vitamin B12) आतड्यांतील मायक्रोबायोटा, टी-सेल (T-cell)उत्पादनास मदत करते आणि इम्युनोमोड्युलेट (Immunomodulator) आहे.

हे ही वाचा:

मध्यप्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानाचा भीषण अपघात

आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, ‘वंचित’सोबतच्या आघाडीबाबत पवारांच मोठं वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss