थंडीत तुमचे हात पाय सुजतात का ?

थंडीत तुमचे हात पाय सुजतात का ?

सध्या हिवाळ्याचा काळ सुरु आहे. त्यामुळे वातावरणातील थंडीमुळे बऱ्याच लोकांना सर्दी, खोकला, ताप अशा आजारांना सामोरे जावे लागते. तसेच हिवाळा हा ऋतू गुलाबी थंडी बरोबर अनेक आजारपण देखील घेऊन येतो. याचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो . या ऋतूमध्ये सर्दी, खोकला, फ्लूच्या तक्रारी लोकांना खूप त्रास देतात. शरीर उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे घालावेत तसेच आहाराची काळजी घ्यावी. नाहीतर अनेक जुन्या आजारांमुळे सूज येऊ शकते.

थंडीत हात,पाय, सांधे दुखणे अश्या अनेक समस्यांना जास्त करून संधिवात असलेल्या रुग्णांना सामोरे जावे लागते. पण असे आढळले आहे की अनेक जणांना जास्त थंडीमुळे हात-पाय दुखणे आणि सूज येण्याची समस्या वाढू लागते. हिवाळ्यात सूज फक्त हात, पाय आणि सांधे यांनाच येत नाही, तर चेहऱ्यावर आणि डोळ्यांवरही सूज येऊ शकते .या समस्येमध्ये वातावरणातील थंडीमुळे तुमच्या रक्तवाहिन्या फुगून हात पायांना सूज येऊ शकते. जर तुम्हाला ही समस्या असेल. तर तुम्हाला थंडीपासून वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. या तुमच्या समस्येमागे अनेक कारण असू शकतात. यातही तुम्हाला आहारातील काही पदार्थांचे सेवन टाळावे लागेल. तर आता आम्ही तुम्हाला या पदार्थांबद्दल संगर आहोत. ज्याचे सेवन सहसा तुम्हाला टाळावे लागेल.

अल्कोहोल : जर तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल तर सावध व्हा. कारण अल्कोहोलच्या अतिसेवनाने शरीरात सुजेचे प्रमाण वाढू शकते आणि आपल्या अवयवांचे नुकसान होऊ शकते.म्हणूनच अल्कोहोलचे सेवन टाळा.

साखर : हिवाळ्यात सूज येण्याची समस्या असल्यास आहारात साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा शक्य असल्या साखरेचे सेवन करण्यास टाळा साखरेचे जास्त सेवन केल्याने तुमच्या शरीरात सूज निर्माण होण्याची समस्या वाढू शकते.

प्रक्रिया केलेले अन्न : तुम्ही फास फूडच्या नावाने अनेक फ्राईज, चीज स्टिक्स, बर्गर आणि रोल यांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये फॅट आणि कॅलरीज जास्त असतात. या पदार्थांच्या देखी जास्त सेवनाने तुमच्या शरीराला सूज येऊ शकते.

हे ही वाचा:

नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील अखेर आल्यामोर, नॉट रिचेबलचे कारण योग्य वेळेवर सांगेन

आमच्या विकासकामांवर शिंदे – फडणवीस फोटो लावतात, आदित्य ठाकरेंचा आरोप

BMC आयुक्त इक्बाल सिंग चहल ईडी कार्यालयात दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version