झोपेमुळे वजन होते कमी?

झोपेमुळे वजन होते कमी?

लठ्ठपणा आजकाल माणसांमध्ये वाढताना खूप दिसत आहे. लठ्ठपणा ही एक सामान्य बाब झाली आहे. लठ्ठपणा जास्त प्रमाणात वाढल्यास आपण अनेक आजरांना निमंत्रण देतो. तुम्ही जर वजन वाढण्याच्या समस्याला त्रस्त झाला असेल तर तुम्ही एका सोप्या पद्धतीने वजन कमी करू शकता. त्यासाठी तुम्हाला पुरेशी झोप (sleep) घ्यावी लागेल. वजन कमी करण्यासाठी झोप हा चांगला आणि सोपा उपाय आहे.

हे ही वाचा : फळांवर मीठ आणि साखर घालून खाताय? तर आरोग्यासाठी हानिकारक

 

वजन कमी करण्यासाठी झोप खूप फायदेशीर आहे. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात, डाएट करतात. पण झोपेकडे दुर्लक्ष करतात. ही चूक करु नका. वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे घेणे गरजेचे आहे. झोप पूर्ण न झाल्यास आरोग्य बिघडते. आणि आपली चिडचिड देखील होते.

शरीराचे आरोग्य जपण्यासाठी झोप खूप गरजेची आहे. झोप पूर्ण न झाल्यास जास्त प्रमाणात भूक लागते. आणि त्यामुळे खाण्याचे प्रमाण वाढते. झोप न पूर्ण झाल्यास पचनक्रिया बिघडते. पोटासंभंधित आजार होण्याची शक्यता असते. अपुरी झोप घेणारी लोक जास्त कॅलरीयुक्त पदार्थ सेवन करतात, त्यामुळे अशा लोकांना जास्त थकवा येतो.

 

रोज ८ तास झोप पुरेशी झाल्यास वजन कमी करण्यास मदत होते. पुरेशी झोप घेतल्याने तणाव दूर होतो. पूर्ण झोप न घेण्याचा परिणाम तणाव आणि लठ्ठपणावर होतो. अधिक ताण घेतल्याने तुम्ही जास्त खाता आणि यामुळे वजन वाढते. त्यासाठी वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे.

झोप पूर्ण न झाल्यास एकाग्रता होत नाही. आणि डोके दुखी , चक्कर येणे , चिडचिड होणे , जास्त खाणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. जर तुम्हाला वजन नियंत्रणामध्ये आण्याचे असेल तर पुरेशी झोप तर आहे गरजेची त्याच बरोबर फायबर युक्त पदार्थ आणि योग्य आहार देखील गरजेचा आहे.

चांगली झोप लागण्यासाठी रात्री झोपताना फोनचा कमी वापर करा , हलके जेवण सेवन करा , वेळेवर झोपा , वेळेवर व्यायाम करा त्यामुळे चांगली झोप लागते. झोप पूर्ण झाल्यास आपले आरोग्य देखील निरोगी राहते.

हे ही वाचा :

दसरा मेळाव्यामुळे वाहतुकीत बदल; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

 

Exit mobile version