Google Pay for Business App डाऊनलोड करा आणि कर्ज मिळवा

Google Pay for Business App डाऊनलोड करा आणि कर्ज मिळवा

गुगल (Google) ही भारतातील एकमेव अशी कंपनी आहे; जी ग्राहकांची गरज लक्षात घेऊन त्यानुसार ग्राहकाला सेवा पुरवते. गुगलच्या सर्च इंजिनबद्दल तर तुम्हाला माहिती आहेच. जगातील अशी कोणतीच गोष्ट नाही. जी गुगलला माहित नाही. गुगल आता या डेटाच्या पलिकडे जात आपल्या ग्राहकांना प्रत्यक्ष लाईफमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुढे सरसावला आहे. भारतातील छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यात खूप अडचणी येतात. विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या मागणीमुळे कर्जदार बँकेकडून कर्ज घेण्याच्या भानगडीतच पडत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन गुगल पे ने किरकोळ व्यावसायिकांना १५,००० रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. गुगल फॉर इंडियाने भारतातील आपल्या ग्राहकांसाठी कर्ज मिळवून देण्याची नवीन सुविधा सुरू केली. गुगल पे च्या या कर्ज सुविधेतून लहान किरकोळ व्यापाऱ्यांना १५ हजारांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. या कर्जाची परतफेड कर्जदार १११ रुपयांच्या हफ्त्याने करू शकतो. गुगल पे वरून मिळणाऱ्या कर्जासाठी अर्जदाराला किमान कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तेही सर्व कागदपत्रे ऑनलाईन जमा करावी लागत असल्याने, अर्जदाराला कोणत्याही बँकेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागत नाही. तो घरात बसून कर्जासाठी अर्ज करू शकतो. गुगलने या कर्जाच्या प्रकाराला Sachet Loans असे नाव दिले.

किरकोळ विक्रेत्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी गुगल पे ने DMI Finance सोबत भागीदारी केली आहे. डीएमआय फायनान्सच्या माध्यमातून ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचबरोबर गुगलने ग्राहकांसाठी ePayLater ही सुविधासुद्धा सुरू केली. या सुविधेच्या क्रेडिट लाऊनच्या माध्यमातून कोणीही ऑनलाईन आणि ऑफलाईन वस्तू खरेदी करू शकतात. गुगल इंडियाने ही सुविधा सध्या फक्त २ टिअर शहरांमध्ये सुरू केली आहे. तसेच ज्यांचे मासिक उत्पन्न ३० हजार रुपये आहे. ते ग्राहक या कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतात. ही कर्ज सुविधा मिळवण्यासाठी अर्जदाराचे फक्त गुगल पे वर खाते असून चालणार नाही. त्यासाठी त्याचे Google Pay for Business अ‍ॅपवर खाते असणे आवश्यक आहे.

‘गुगल पे’द्वारे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत?

  1. सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून Google Pay for Business App डाऊनलोड करा.
  2. अ‍ॅपमध्ये लोन या सेक्शनमध्ये जा आणि ऑफर्सवर क्लिक करा.
  3. उपलब्ध असलेल्या माहितीतून कर्जाची रक्कम निवडा आणि Get Started वर क्लिक करा.
  4. गुगल अकाऊंटमध्ये लॉगिन करा आणि तुमची माहिती भरा.
  5. कर्जाची रक्कम आणि कर्जाचा कालावधी ठरवून घ्या.
  6. सर्व भरलेली माहिती तपासून e-sign करा. त्यानंतर केवायसीसाठी कागदपत्रे सबमिट करा.
  7. ईएमआय पेमेंटसाठी Setup eMandate किंवा Setup NACH वर क्लिक करा.
  8. कर्जाची रक्कम अ‍ॅपमधील My Loan सेक्शनमध्ये तुम्हाला पाहता येईल.

तर मग या सर्व स्टेप्स फॉलो करा आणि सर्व माहिती घेऊनच गुगल पे मधून कर्ज मिळवा.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवरच मनोज जरांगेंच्या भाषेचा दर्जा घसरतोय, सकल मराठ्यांची चिंता

पंकज त्रिपाठीच्या कडक सिंह चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version