दररोज प्या ८ ग्लास पाणी ; शरीरासाठी आवश्यक

जीवनातील तीन गरजांपैकी महत्वाचे म्हणजे पाणी . पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते.

दररोज प्या ८ ग्लास पाणी ; शरीरासाठी आवश्यक

जीवनातील तीन गरजांपैकी महत्वाचे म्हणजे पाणी . पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. पाणी न प्यायल्याने काय होईल? असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही पाणी कमी पित असाल तर तुम्हाला बऱ्याच आजारांना समोर जावे लागू शकते. डॉक्टरांच्या आधारे दररोज कमीत कमी ८ ग्लास तरी पाणी हे प्यायलेच पाहिजे . शरीराची कार्यक्षमता राखण्यासाठी पाण्याची गरज असते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याची शिफारस तज्ज्ञ करतात. मानवाच्या शरीराला ७० टक्के पाण्याची गरज (water) असते. आपल्या सर्वांनाच रोज पाणी पिण्याची आवश्यकता असते. शरीरातील सर्व अवयवांना त्यांची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता. असते. शरीराची सर्व कार्य (body function) योग्य रितीने चालावीत यासाठी योग्य आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणे हे खूप महत्वाचे आहे. उष्णता आणि बदलते हवामान, ताप किंवा उलट्या-जुलाब अशा अनेक कारणांमुळे शरीरात डिहायड्रेशनचा (dehydration) त्रास होऊ शकतो.या सर्व त्रासाचं एकमेव उपाय म्हणजे पाणी आहे .

जास्त पाणी प्यायल्यामुळे आपण बऱ्याच आजरांपासून दूर राहू शकता –

१. डोकेदुखी न होणे
२. अन्नपचन सुरळीत होणे
३. वजन कमी होण्यास मदत
४. किडनीच्या आजारापासून बचाव करण्यास मदत करते

काही गोष्टी लक्षात करून घ्या –

१. डोक्यात पाण्याचे प्रमाण ब-यापैकी असते त्यामुळे कमी प्रमाणात पाणी पिल्यास चक्कर येणे, थकवा येणे, डोके दुखणे अशा समस्या उद्भवू शकतात त्यामुळे जास्तीत जास्त मात्रेत पाणी नक्की प्या.

२. दररोज कमीतकमी 8 ग्लास पाणी पीणे जरूरी असते .

३. पाणी शुध्द आणि पिण्यायोग्य असावे. खारे पाणी शक्यतो पिऊ नये.

४. पाणी पिण्याची सवय दररोज करण्यासाठी एक ते दोन आठवडे रोजच्या पाणी पिण्याची नोंद ठेवा, असे केल्याने योग्य प्रमाणात पाणी पिण्यात येईल व तोवर तुम्हास सवय लागेल.

हे ही वाचा:

Nyrraa Banerji ला शूटींग दरम्यान दुखापत!

पुणे-सातारा महामार्गावर आणखी एक अपघात

सगळं काही भाजपचंच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version