चहा कॉफी ऐवजी प्या ही पेय आणि आठवड्याभरात मिळवा चमकदार त्वचा

चहा कॉफी ऐवजी प्या ही पेय आणि आठवड्याभरात मिळवा चमकदार त्वचा

सकाळी उठल्यावर चहा आणि कॉफी पिण्याची सवय प्रत्येकालाच असते. रात्रभर काहीही न खाल्ल्याने किंवा पाणी न प्यायल्याने, सकाळी सर्वात आधी पोटात जाणारे पोषक तत्व सहज शोषली जातात. त्यामुळे सकाळची सुरुवात काही खास हेल्दी ड्रिंकने केल्यास त्वचा आणि केस दोघांनाही त्याचे फायदे होऊ शकतात आणि तुम्हालाही तुमची त्वचा चमकदार बनवायची असेल तर करून पहा हे घरगुती उपाय.

हे ही वाचा : सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो ? तर हि बातमी खास तुमच्यासाठी…

 

कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिक्स करून प्याल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्याचबरोबर लिंबात असलेले व्हिटॅमिन सी त्वचेवर चमक आणते.

सकाळीची सुरुवात चहाने आणि कॉफीने न करता ग्रीन टीने करा. रात्रभर मंद झालेली चयापचनाची क्रिया ग्रीन टीमुळे सक्रिय होते.

त्वचा चमकदार हवी असेल तर दुधात हळद मिसळून प्या. हळदीचे दूध, अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते जे नवीन पेशींच्या वाढीस गती देते.

गाजर आणि बीटात पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. रोज गाजर आणि बीटचा रस प्यायल्याने त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते.

 

त्वचा चमकदार व्हायला हवी असेल तर तुम्ही ताज्या फळांचा आहारात समावेश करू शकता किंवा त्यांचा रसदेखील पिऊ शकता. त्यासाठी तुम्ही संत्र आणि डाळिंब घ्या आणि ते सोलून मिक्सकर मध्ये वाटून त्याचा रस बनवून रोज सकाळी प्या.

१ काकडी घ्या आणि १० -१५ पालकाची पाने घ्या आणि काकडी आणि पालक मिक्स करून वाटून घ्या. त्यात थोडे मध मिक्स करा आणि तो रस प्या.

नारळ पाणी सकाळी – सकाळी उठल्यावर आवर्जून प्या. कारण नारळ पाण्यात व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन बी ३, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आणि नारळाचे पाणी नियमितपणे प्यायल्याने त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो.

हे ही वाचा :

महिला भारतीय संघाने उडवला इंग्लंडचा धुव्वा

 

Exit mobile version