spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Dry skin हिवाळयात कोरड्या त्वचेपासून त्रस्त आहत? मग चेहऱ्यासाठी ‘या’ फळाचा वापर करा

dry skin : हिवाळयात थंडीचे प्रमाण जास्त असते, आणि त्यामुळे त्वचेसंभंधित अनेक समस्या उध्दभवत असतात. थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. नाही तर त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून हिवाळयात त्वचा कोरडी dry skin पडल्यास कोणत्या फळाचा वापर करावा या बद्दल सांगणार आहोत.

थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी dry skin झाली की त्याचा प्रचंड त्रास होतो, कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेल्यावर आपली त्वचा कशी दिसते या कडे आपले जास्त लक्ष असते. थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडणे ही सामान्य बाब झाली आहे, पण याचा प्रचंड त्रास होतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी होणार नाही. आणि मऊ देखील होईल.

 

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यावर त्वचेला खाज येणे जळजळ होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. बहुतेक लोक त्वचेला महागड्या क्रीमचा वापर करतात आणि त्याचा जास्त प्रमाणात देखील वापर करतात त्यामुळे त्वचेला पिंपल्स येणे जळजळ होणे चेहऱ्याची त्वचा लाल होणे इत्यादी समस्या दिसून येतात. म्हणून थंडीच्या दिवसात चेहऱ्याला पपई लावल्यास किंवा पपईचा फेस पॅक लावल्यास चेहऱ्याला अनेक फायदे होतील. पण तुम्हाला पपईचा चेहऱ्यासाठी कसा वापर करावा या बद्दल सांगणार आहोत. तसेच पपईचे अनेक फायदे देखील आहेत.

थंडीच्या दिवसात कोरड्या त्वचेला ( dry skin ) पपईचा फेस पॅक लावल्यास अनेक फायदे होतील. पपईचा फेस पॅक तुम्ही घरी देखील बनवू शकता, त्यासाठी गरजेनुसार पपई घेणे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेणे, त्यानंतर अर्धा चमचा मध , अर्धा चमचा लिंबाचा रस त्यामध्ये घालून घ्या, असा प्रकारे पपईचा फेस पॅक त्वचेसाठी तयार आहे. पपईचा फेस पॅक (Papaya face pack) चेहऱ्याला लावल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. तसेच हा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचेला आराम मिळतो आणि त्वचा कोरडी देखील होत नाही.

हे ही वाचा : 

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

 

 

Latest Posts

Don't Miss