कडीपत्त्याच्या स्पेशल चटणीसाठी जाणून घ्या सोपी रेसिपी

कडीपत्ताची अगदी साध्या-सोप्या पध्दतीने चटणी ही तयार करता येऊ शकते हे तुम्हाला माहित आहे का? ज्यांना जेवणात कडीपत्ता आवडत नाही अशा लोकांसाठी तर ही चटणी अतिशय फायद्याची आहे.

कडीपत्त्याच्या स्पेशल चटणीसाठी जाणून घ्या सोपी रेसिपी

कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी फारच गुणकारी असतो. कडीपत्ता खाल्ल्याने स्किन आणि केसांना देखील चांगल्या प्रकारे फायदा होतो. कडीपत्त्यामध्ये लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळतो. कडीपत्त्यामुळे जेवणाला एक वेगळीच चव येते. पण ह्या कडीपत्ताची अगदी साध्या-सोप्या पध्दतीने चटणी ही तयार करता येऊ शकते हे तुम्हाला माहित आहे का? ज्यांना जेवणात कडीपत्ता आवडत नाही अशा लोकांसाठी तर ही चटणी अतिशय फायद्याची आहे. चला तर मग पाहूया ही चटणी तयार करण्यासाठीची साहित्य आणि कृती:

साहित्य-

कडीपत्ता
उडीद डाळ
लाल सुक्या मिरच्या
पांढरे तीळ
किसलेलं खोबरं
गुळ
तेल

कृती-

सगळ्यात आधी पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घालावे. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा उडीद डाळ आणि ३ ते ४ लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्यावे. भाजलेलं साहित्य एका वाटीमध्ये काढून घ्या. त्यात एक चमचा पांढरे तीळ, मुठभर कडीपत्त्याची धुवून घेतलेली पानं, चिंच आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य भाजून घ्यावे. साहित्य भाजून झाल्यानंतर एका वाटीमध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यावे. त्यानंतर त्यात एक वाटी किसलेलं खोबरं घालावे. यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण घालावे. त्यात एक गुळाचा खडा घालून पेस्ट तयार करून घ्यावी. त्यात पाणी घालू नये. ही पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यावी. अशाप्रकारे अगदी सोप्या आणि साध्या पध्दतीने ही कडीपत्त्याची स्पेशल चटणी तयार होईल. काही लोक जेवताना कडीपत्ता बाजूला काढून ठेवतात. अशा लोकांसाठी ही चटणी अतिशय फायदेशीर आहे.

हे ही वाचा:

Nagpanchami 2023, नागपंचमी स्पेशल खास बेत घरीच करा टेस्टी आणि स्वादिष्ट दाल बाटी…

Independence Day 2023, यंदाचा स्वातंत्र्यदिनानिमित्त घरच्याघरीच करा टेस्टी आणि स्वादीष्ट असा तिरंगा डोसा..

‘सुभेदार’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे …

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version