पिस्ता खा आरोग्य उत्तम ठेवा

सुकामेवा खायला अनेक जणांना आवडतो.मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरते.

पिस्ता खा आरोग्य उत्तम ठेवा

सुकामेवा खायला अनेक जणांना आवडतो.मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरते. पिस्ता हा चवीला उत्तम ठरतो. त्यामुळे अनेकजण पिस्ता आईस्क्रीम ,खीर,हलवा अशा अनेक गोड पदार्थांमध्ये टाकुन त्याचे सेवन करत असतात.हिरव्या रंगाच्या पिस्त्यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शियम आणि इतर अन्य पोषक तत्वे असतात. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.चला तर पाहुयात पिस्ता खाण्याचे फायदे.

हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरतो. हृदयाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरत. हे कोलेस्ट्रॉल कमी करतं. त्यात असणारे गुणधर्म हृदयाचं आरोग्य चांगले राखते.

चेहऱ्याचं सौंदर्य राखण्यासाठी पिस्ता गुणकारी ठरतो. हे एखाद्या नैसर्गिक औषधापेक्षा कमी नाही. वाढत्या वयाची लक्षण रोखण्यासाठी आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरतो.

डायबिटीज वाढण्यापासून रोखण्याच काम करतो. यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे साखर नियंत्रणात राखण्यास मदत होते.

मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी पिस्ता खाणे फायदेशीर ठरते. काजू, बदाम पेक्षाही जास्त पौष्टिक असतो. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. म्हणून लहान मुलांना पिस्ता खाण्यासाठी देणे चांगले आहे.

शरीरावर सूज आल्यास पिस्त्याचे सेवन करणं फायदेशीर ठरत. यात असलेल्या व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई मुळे सूज कमी होण्यास मदत होते.

पिस्त्यात असलेल्या फॅटी अ‍ॅसिडमुळे त्वचेचा नैसर्गिक रंग उजळतो.

Exit mobile version