Thursday, July 4, 2024

Latest Posts

पावसाळ्यात ‘भुट्टा’ खाताय मग हे नक्की वाचा; ‘असा’ ही होतो फायदा

एका मक्याच्या कणीसमध्ये ८६ ते ९० कॅलरीज असतात. पावसाळ्यात भुट्टा खाल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. तसेच ते बाराही महिने खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे.

पावसाळ्याच्या दिवसात ‘भुट्टा’ (Sweet Corn) खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. एका बाजूला धो-धो पडणारा पाऊस आणि दुसऱ्या बाजूला गरमा गरम तिखट-मीठ आणि लिंबू लावलेला भुट्टा पाहिल्यानंतर मोह आवारता येत नाही. सगळीकडे प्रसिद्ध असणारा भुट्टा म्हणजे मक्याचे कणीस, याला स्वीट कॉर्न असेही म्हणतात. पावसाळ्यात मक्याच्या कणीसला खूप मागणी असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मक्याचे कणीस हे आवडीने खातात. पावसाळ्यात तुम्हाला जागोजागो मक्याचे स्टॉल लावलेले दिसून येतात. कारण या ऋतूमध्ये चटपटीत चवीचा, कोळश्यावर खरपूस भाजलेला आणि त्यावर तिखट मीठ लिंबू लावलेला भुट्टा खाण्याची अनेकांची इच्छा होते. बाहेरच्या थंडगार वातावरणात मक्याचे दाणे खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. पावसाळ्यात जिभेला सुखावणारा हा भुट्टा चवीला जितका चटपटीत लागतो, तितकाच तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

एका मक्याच्या कणीसमध्ये ८६ ते ९० कॅलरीज असतात. पावसाळ्यात भुट्टा खाल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. तसेच ते बाराही महिने खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. मका एक पौष्टिक धान्य आहे जे आवश्यक पोषक आणि फायबर समृद्ध आहे. मक्यातील फायबर बरेच काळ पोट भरलेले ठेवते. त्यामुळे भूक नियंत्रित होते, परिणामी वाढणारे वजन नियंत्रणात येते. तसेच यातील फायबर घटकामुळे निरोगी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मक्यामध्ये बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे आढळतात, ज्याने आपली चयापचय क्रिया चांगली राहते. मक्याच्या कणीसमध्ये लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६, मॅग्नेशियम आणि पोटॅशिअम यासारखे पोषक घटक असतात, जे रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत करतात. तसेच मक्यामध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे खनिजे असतात, जे हाडे आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. मक्याच्या कणीसमध्ये अँटीऑक्सीडेंट आणि  जीवनसत्वे असतात, ते डोळे निरोगी ठेवतात. आहारात मक्याच्या कणीसचा समावेश केल्याने दृष्टी सुधारू शकते.

मक्याच्या कणीसपासून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीजसुद्धा बनवू शकता. मक्याच्या दाण्यांपासून तुम्ही सर्वांच्या पसंतीची स्वीट कॉर्न चाट, मक्याची भजी, कॉर्न चीज बॉल्स अशा अनेक डिश बनवू शकता. सकाळी मुलांना शाळेत जाताना डब्यासाठी स्वीट कॉर्न हा उत्तम पर्याय आहे. मक्यापासून बनवलेले पदार्थ तयार करायला जास्त वेळही खर्च होत नाही शिवाय ते पौष्टिक असल्याकारणाने मुलांना त्याचा आरोग्यासाठी फायदाच होईल.

हे ही वाचा

 

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss