हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम युक्त पदार्थ खाणे ; जाणून घ्या टिप्स

हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम युक्त पदार्थ खाणे ; जाणून घ्या टिप्स

थंडीच्या दिवसात सांधे दुखीचा त्रास जास्त प्रमाणात होतो. हाडे कमकुवत होणे देखील एक प्रकारचा आजार आहे. सांधेदुखी मुळे अनेक आजार देखील होतात. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम खूप उपयुक्त असते. शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवली तर हाडे खूप कमकुवत होतात, आणि गॅप देखील पडतो. त्यामुळे अजून थंडीच्या दिवसात त्रास होतो. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम युक्त पदार्थ सांगणार आहोत.

हिवाळयात हाडे मजबूत करण्यासाठी निरोगी आहार देखील महत्वाचा आहे. निरोगी आहार मुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वे देखील मिळतात. हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम पदार्थ देखील महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया हाडे मजबूत करण्यासाठी कोणते पदार्थ वापरता येतील.

 

हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही रोज दुधाचे देखील सेवन करू शकता. कारण दुधामध्ये देखील जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. तसेच दुधामध्ये प्रथिने आणि चांगले कार्बन देखील असते. जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप गरजेचे असते. दुधाचे सेवन केल्याने जास्त प्रमाणात भूक देखील लागत नाही. म्हणून हाडांच्या आरोग्यासाठी नियमित पणे दुधाचे सेवन करावे.

रोज पालक या भाजीचे सेवन करणे. यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी मदत होते. पालक मध्ये कॅलशीमचे प्रमाण जास्त असते.

अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असतात. हाडांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी देखील महत्वाचे आहे. तसेच अंडी मध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन, असे पोषक तत्वे असतात. जे हाडांसाठी खूप उपयोगी आहेत. रोज सकाळी उठून किमान २ अंडी तरी सेवन करणे.

तीळ खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत. तसेच तीळ मध्ये जास्त प्रमाणात कॅल्शिम असते. तसेच तीळ मध्ये मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॉपर, झिंक आणि फॉस्फरस देखील असते. हे पोषक घटक हाडांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर पडते. रोज तिळाचे सेवन आवर्जून करा.

कॅल्शियमच्या विकासासाठी केळीचे सेवन करणे. केळी मध्ये मॅग्नेशियम असते. जे हाडांसाठी खूप गरजेचे असते. नियमित पणे केळीचे सेवन केल्याने पचनास देखील मदत होते. आणि त्वचेवर चमक देखील येते.

 

हे ही वाचा :

मुख्यमंत्री, उद्योग आणि कृषी मंत्र्यांचं नाव काय गद्दार; आदित्य ठाकरे

WhatsApp Update : व्हाट्सअँपने यूजर्सला दिली ‘हि ‘ खास भेट; घ्या जाणून

Thackeray Vs Shinde : सिल्लोडमध्ये ठाकरे-शिंदेच्या सभेची चर्चा, आदित्य ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स पाहिले का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version