फळांवर मीठ आणि साखर घालून खाताय? तर आरोग्यासाठी हानिकारक

फळांवर मीठ आणि साखर घालून खाताय? तर आरोग्यासाठी हानिकारक

जर तुम्हाला कापलेल्या फळांवर मीठ किंवा साखर टाकून खायाला आवडत असेल तर आरोग्याची काळजी घ्या . तसेच आरोग्यसाठी फळे खाणे चांगले असते . तसेच फळ खाणे सर्वांना खूप आवडते .अनेक लोक फळांचा सॅलेड बनवून खातात. काहीजण कापलेल्या फळांवर चाट मसाला देखील टाकून खातात . यामुळे फळांना एक वेगळीच चव येते. काहीजण फळांवर साखर मीठ टाकून खातात पण हे आरोग्यासाठी नुकसान कारक आहे . यामुळे तुमचे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून फळे सेवन करण्याची पद्धत जाणून घ्या .

हे ही वाचा : गर्भपात झालेल्या महिलांसाठी ‘खास’ बातमी

 

काहीजणांनी टरबूज आणि पेरू वर मीठ घालून खाले आहे. बऱ्याचदा लोक ताजी फळे कापून त्यावर मीठ आणि साखर टाकून खातात हे आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकते .

फळांवर मीठ टाकून खाल्यास फळांना पाणी सुटे. यामुळे फळांमधील पोषक तत्वे निघून जातात. त्याचप्रमाणे मीठ किंवा चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम किडनीवर परिणाम घातक ठरू शकते. तुम्ही फळांवर मीठ आणि चाट मसाला दोन्ही एकत्र करून टाकत असला तर ते नुकसान कारक ठरू शकते. कारण चाट मसाला मध्ये अगोदरच मीठ असते त्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते आणि आरोग्य बिगडू शकते .

 

फळांवर साखर टाकून खाऊ नये . नैसर्गिकरित्या फळे गोड असतात .आणि फळांमध्ये ग्लुकोज असते. फळांचे सेवन केल्याने शरीरातील कॅलरीज वाढते. आणि तुम्ही कापलेल्या फळांमध्ये साखर टाकून खाल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते . त्यामुळे तुम्हाला मधुमेहाची समस्या उद्भवू शकते . तसेच शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यास वजन वाढीस देखील मदत होते. यामुळे कापलेल्या फळांवर साखर टाकून खाऊ नये .

तसेच अन्नासोबत तुम्ही फळांचे सेवन करू शकता . अन्नासोबत फळांचे सेवन केल्यास कार्ब आणि कॅलरीजचे प्रमाण वाढतात. त्यामुळे अन्नांमधील कार्बनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तुम्ही अन्नासोबत फळांचे सेवन करू शकता .

हे ही वाचा :

तुम्हाला घनदाट केस आवडतात ? तर या टिप्स तुमच्यासाठी…

 

Exit mobile version