spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे !

मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा आपण आपल्याकडे लक्ष देणे कमी करतो. याचा परिणाम हा फार दूरगामी होतो. या दैनंदिन जीवनात स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला काही आजार हे सुरुवातीला अगदीच लहान समजतो. पण ते पुढे जाऊन प्रचंड त्रासदायक ठरू शकतात. यासाठी स्वतः कडे लक्ष देणं फार गरजेचे आहे. काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याया वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

लसूण हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, परंतु त्याचे फायदे खाण्याच्या पद्धतीवर देखील अवलंबून असतात. तुपात तळलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. या दोघांमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. लसणात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, तर तुपात जीवनसत्त्वे आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळतात. ते अनेक रोगांशी लढण्याचे काम करतात.

हृदयासाठी चांगले आहे :

लसूण हृदयासाठी चांगले मानले जाते. तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तुपात तळलेला लसूण देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

श्वसनासंबंधित रोग चांगले होतात :

लसणाचा प्रभाव हा गरम असतो. हिवाळ्यात लसूण तुपासोबत खाल्ल्यास श्वासासंबंधीच्या समस्या टाळता येतात. अशा प्रकारे लसूण खाल्ल्याने श्वसनसंस्था मजबूत होते. दम्यासारख्या आजारातही हे फायदेशीर आहे.

पचनासाठी चांगले :

लसूण हे चांगले पाचक मानले जाते. तुपात लसूण तळून खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि ॲसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने अन्न पचायला सोपे जाते.

प्रतिकारशक्ती वाढते :

तुपात तळलेला लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. लसणात असलेले औषधी गुणधर्म सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर आहेत. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. तुपात भाजून लसूण खाल्ल्याने सर्दी-खोकला यांसारख्या समस्या दूर होतात.

हाडे मजबूत होतात :

लसणात कॅल्शियमसारखे खनिजे आढळतात जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, सूज आणि दुखण्याची समस्याही दूर होते.

हे ही वाचा:

SANKASHTI CHATURTHI 2024: जाणूयात संकष्टी चतुर्थी विषयीची महती ; उपवास कसा करावा ते उपवास कसा सोडावा..

MCA ELECTION : अजिंक्य नाईक ठरले MCA च्या नव्या अध्यक्षपदाच्या विजयाचे मानकरी..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss