spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पेरूच्या पानांमध्ये ‘हे’ पदार्थ मिक्स करून खाल्ल्याने शरीराला होतो फायदा, जाणून घ्या फायदे

बदलत्या जीवनशैली, कामाचा ताण या सगळ्यामुळे शरीराच्या अनेक समस्या उध्दभवतात.

बदलत्या जीवनशैली, कामाचा ताण या सगळ्यामुळे शरीराच्या अनेक समस्या उध्दभवतात. अश्यावेळी आपण बाजारातील औषधांवर अवलंबून असतो पण बाजारातील औषध न खाता आपण काही घरगुती उपाय करू शकतो. काही घरगुती उपाय हे शरीरासाठी अंत्यंत फायदेशीर असतात. अश्याच एक घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बाजारातून आपण अनेकदा घरी पेरू आणून खातो. त्यावर मिठ, मसाला टाकला की पेरूची चव अजून छान लागते. पण पेरू सोबतच पेरूची पाने देखील खूप गुणकारी असतात. पेरूच्या पानांचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो.

पेरूच्या पानांमध्ये पॉलिसेकेराइड, फायबर, व्हिटॅमिन सी, अँटी-हायपरग्लायसेमिक यांसारखे गुणधर्म आढळून येतात. ही पाने खाल्ल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येत आणि लठ्ठपणा कमी होतो. यामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात.पेरूच्या पानांमध्ये पोषक तत्वांचे भांडार आहे. यामध्ये पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी आणि सी व्हिटॅमिन असतात. पेरूची पानं आणि आलं एकत्र खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. पेरूच्या पानांचा अर्क आणि आल्याचं सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. पेरूच्या पानांचे नियमित शेण केल्याने शरीरसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

आल्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. पेरूचे पान आणि आलं यांचे एकत्रित सेवन केल्याने मधुमेहाची पातळी नियंत्रित राहते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मोठ्या प्रमाणात पेरूची पाने मदत करतात. जर तुम्हाला दात दुखीचा त्रास जाणवत असेल तर तुम्ही पेरूचे पान आणि आलं यांचे एकत्रित मिश्रण करून दातांना लावू शकता. हे मिश्रण काही काळ दातांवर लावू ठेवा. त्यामुळे वेदना कमी होतात. पेरूची पाने वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. १ कप पाण्यात पेरूची पाने आणि किसलेलं आलं टाकून ते चांगलं मिक्स करून घ्या. त्यामुळे कमी कालावधीत झपाट्याने तुमचे वजन कमी होईल.

हे ही वाचा:

महिला दिनानिमित्त आपल्या आवडत्या व्यक्तीला द्या ‘या’ खास भेटवस्तू

आलो तर तुझा,गेलो तर समाजाचा,मनोज जरांगे यांच्या संघर्षयोध्दा चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss