spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोबाईलच्या अतिवापर केल्याने, आरोग्यावर होतील परिणाम

आजकाल मोबाईलचा (mobile) वापर जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. मोबाईलचा जास्त प्रमाणात वापर केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतांना दिसत आहे. बदलत्या काळानुसार मोबाईल ही आज प्रत्येक माणसाची हौस नाही तर गरज बनली आहे. मोबाईल २ मिनिटे हातात नसला तरी तर आपला जीव राहत नाही. काही जण तर सतत मोबाईलचा वापर करतांना दिसत असतात. पण आजकाल लहान मुलांमध्ये देखील मोबाईलचा (mobile) जास्त वापर होताना दिसत आहे. या बातमीमधून आम्ही तुम्हाला मोबाईलच्या अतिवापर केल्याने,आरोग्यावर काय परिणाम होतील ते सांगणार आहोत.

हे ही वाचा : डोळे येणे म्हणजे काय ? जाणून घ्या

 

फोनचा वापर कमी करावा. नाहीत तर डोळ्यांच्या आजारांना बळी जाऊ शकतो. तसेच फोनचा अतिवापर केल्याने डोळे खराब होऊ लागतात. डोळे खराब झाल्यास चष्मा लागण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. जर आपण डोळ्यांच्या विकारांवर दुर्लक्ष केल्यास मोती बिंदू होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून फोनचा वापर जास्त प्रमाणात करू नये. गरजे पेक्षा जास्त फोन वापरू नये.

फोन वापरतांना मान सरळ ठेवावी. बरेच लोक फोन वापरतांना मान जास्त प्रमाणात खाली ठेवतात आणि फोन वापरतात. त्यामुळे मानेचे विकार होऊ शकतात. किंवा मानेचा नसांना दाब येऊ शकतो. यामुळे मानेचे दुखणे वाढू शकते. कधी कधी असे देखील होते मान जास्त प्रमाणात खाली ठेवली तर मानेला अचानक मध्ये चमक देखील भरते. म्हणून फोन वापरतांना मान कधीपण सरळ ठेवावी.

 

मायोपिया किंवा नियर साइटेडनेस ही एक सर्वसामान्य समस्या आहे, यामध्ये दूरच्या गोष्टी नीट दिसत नाही, किंवा भुरळ दिसू लागते, त्यामुळे जवळच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. सतत घरातच राहणे आणि स्क्रीनकडे जास्त वेळ बघत राहणे यामुळे तुमची नजर हातभर अंतराहूनही जवळ असलेल्या वस्तूवरच खिळून राहते, त्यामुळे नियर सायटेडनेस ही समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते.

डोकेदुखी, चक्कर येणे, कामात मन न लागणे, अशा गोष्टी फोनच्या अतिवापर केल्याने होत असतात. फोन वापरताना आपण कसे पण बसतो त्यामुळे पाठीचा त्रास जास्त प्रमाणात होते. जसे पाठ दुखणे, पाठीमागचा कणा दुखणे, यासारखे दुखणे होत असतात. त्यामुळे फोन वापरतांना सरळ बसावे.

हे ही वाचा :  

दिवाळीत श्वसनाचे आजार टाळण्यासाठी करा हे उपाय…

 

Latest Posts

Don't Miss