लहान मुलांनी फोनचा अतिवापर केल्याने होऊ शकतो आजाराचा धोका ….

लहान मुलांनी फोनचा अतिवापर केल्याने होऊ शकतो आजाराचा धोका ….

आजकालची लहान मुले बऱ्याचदा फोनमध्ये गुंतलेली असतात. कमी वयात लहान मुलांनी फोनचा वापर केला तर ते आजारास निमंत्रण देत आहे. काही पालक लहान मुलांना मनोरंजनासाठी फोन देतात. पण जर एकदा मुलांना फोनची सवय लागली की ती मोडायला खूप टाईम लागतो. आजकालच्या मुलांना लहानपाणापासूनच फोनची सवय असते. जस जसे मुले मोठी होत जातात तस तशी ती सवय वाढत जाते. त्यांचा हातात फोन दिला नाहीतर तर ते जेवायला बसणार नाही असा हट्ट देखील करतात. मग पालक त्यांना फोन देतात आणि त्यांचे हट्ट पूर्ण करतात.

हे ही वाचा : चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी खास घरगुती उपाय

 

आजकालची मुले इतकी फोनमध्ये गुंतलेली असतात की त्यांना फोन शिवाय दुसरे काहीच दिसतच नाही. मग ते आई वडिलांच बघून मॅसेज टाईप करतात. मुले जस जशी मोठी होत जातात तस तसे ते चॅटिंग करतात. आणि मित्र मैत्रीणीला मॅसेज करतात. मॅसेज टाईप करताना त्यांची हाताची बोटे दुखू शकतील त्यामुळे त्यांना लिहिताना त्रास होऊ शकतो.

सतत फोन घेऊन बसल्याने शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि मग त्यांना चालताना, उठताना, बसताना त्याचा त्रास होऊ लागतो. मग चिडचिड होणे, कुठेही लक्ष नाही लागणे अशी अनेक लक्षणे दिसून येतात.

 

फोनचा जास्त प्रमाणात वापर केल्याने आपल्याला झोपेचेही भान राहत नाही. मुले फोनमध्ये इतके गुंतलेले असतात की झोपेची वेळ कधी निघून जाते हे सुद्धा समजत नाही आणि सकाळी उठल्यावर त्यांची झोप पूर्ण झालेली नसते. झोप पूर्ण न झाल्यास मेंदूवर त्रास होतो आणि डोके दुखी असे त्रास होऊ लागतात.

फोनचा अतिवापर केल्याने कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे फोनचा अतिवापर करणे टाळावे.

इंटरनेटवर काहीतरी वाचणे, फोन बराच वेळ वापरणे, झोप न लागणे अशा कारणांमुळेही फोनचा ताण येऊ शकतो. यावर नियंत्रण न ठेवल्यास गंभीर आजार होऊ शकतात.

हे ही वाचा :

विध्यार्थींसाठी खुश खबर, राज्यसरकार गृहपाठ बंद करण्याच्या तयारीत

 

Exit mobile version