हळदीचा अतिवापर आपल्या शरीरासाठी घातक…

रोज आपण जेवण बनवताना हळदीचा (Turmeric) वापर हमखास करतो. कोरोना (Corona) काळात तर हळदीचा खूप वापर झाला.

हळदीचा अतिवापर आपल्या शरीरासाठी घातक…

रोज आपण जेवण बनवताना हळदीचा (Turmeric) वापर हमखास करतो. कोरोना (Corona) काळात तर हळदीचा खूप वापर झाला. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हळदीला अँटीऑक्सिडंट (Antioxidant) आणि अँटीसेप्टिक (Antiseptic) म्हणतात. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म (medicinal properties) आढळतात. पण कोणत्याही गोष्टीचा अतिवापर आरोग्यास हानिकारकच आहे. त्यामुळे हळदीचा अतिवापर आरोग्यास चांगला नाही. हळद ही पोटासाठी खूप गरम असते. त्यामुळे ती कमी प्रमाणात खावी किंवा प्यावी. त्यामुळेच पोटाला त्रास होतो आणि पोटदुखी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. हळद हे लोहाचे शोषण मर्यादित करत असल्याने, जर तुम्ही लोह पूरक आहार घेत असाल तर तुम्ही ते घेऊ नये. त्यामुळे जास्त हळद वापरत असाल तर काळजी घ्या.

हळद जास्त वापरल्याने सारख्या उलट्या आणि लूज मोशन सारख्या समस्या उध्दभवू शकतात. त्यामुळेच हळदीचा वापर एका मर्यादेपर्यंत करावा. हळद ही आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ही असू शकते. हळदीचा जास्त वापर केल्यास तुमच्या पचनामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. हळदीच्या अतिवापराने रोगापासून दूर जाण्या उलट तुम्ही योगाच्या जवळ जाल. ज्या स्त्रिया गरोदर आहेत. त्या मसाला म्हणून हळद असलेले अन्न खाऊ शकतात. परंतु हळद पूरक आहार घेणे हे टाळावे .हे पूरक गर्भाशयाचे आकुंचन उत्तेजित करू शकते आणि गुंतागुंत निर्माण करू शकतात.

बरेच लोक हळदीचा जास्त वापर करतात. त्यामुळे किडनी स्टोन चा धोका देखील वाढू शकतो. हळद जितकी जास्त खाल तितके रोगापासून दूर जाणार हा समज अत्यंत चुकीचा आहे. हळदीचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. हळदीचा वापर मर्यादित प्रमाणात करा. त्यात ऑक्सलेट कॅल्शियम (Calcium Oxalate) असते हे शरीरात विरघळण्याऐवजी बांधते. हळदीचा जास्त वापर केल्याने तुम्ही रोगाच्या जास्त जवळ जाल.

हे ही वाचा: 

संतप्त कार्यकर्त्यांकडून धुळे – सोलापूर महामार्गावर जाळपोळ

इंडिया आघाडीचा मुंबईत येऊन एक मोठा मास्टरस्ट्रोक,  महाराष्ट्रात बसणार मोठा फटका…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version