EYE FLUE : आय फ्लूवर मात कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर

नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळा सुरु झाला की अनेक समस्यांचे आमंत्रण होते. या पावसाळयाच्या दिवसात डोळे येणे ही समस्या मोठ्या प्रमाणात अनेकांना उद्भवल्याची दिसून आली आहे.

EYE FLUE : आय फ्लूवर मात कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर

नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळा सुरु झाला की अनेक समस्यांचे आमंत्रण होते. या पावसाळयाच्या दिवसात डोळे येणे ही समस्या मोठ्या प्रमाणात अनेकांना उद्भवल्याची दिसून आली आहे. अशावेळी अनेकदा eye flu हा आजार म्हणजे नक्की काय तसेच हा आला तर यावर उपाय काय करावे हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी यासाठीची सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत.

आय फ्लू म्हणजे काय? (What is eye flu)

आय फ्लू हा एक प्रकारचा डोळ्याचा संसर्ग असतो. यामध्ये डोळ्याला खाज येणे, डोळे सुजणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, पापण्यांवर सूज येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. यालाच कंजक्टीविटिस (Conjunctivitis) सुद्धा म्हणतात. या आजरात डोळयांना अनेक संवेदना होत असतात. त्यामुळेच यावर त्वरित उपाय करणे गरजेचे असते.

आय फ्लूसाठी कोणते औषध घ्यावे? (Which medicine to take for eye flu)

आय फ्लू कोणत्या स्टेजवर आहे, त्यानुसार औषध घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आय फ्लूचे तीन स्टेजमध्ये विभाजन केले जाते. “पहिल्या स्टेजमध्ये व्यक्तीला सौम्य डोळ्यांचे दुखणे जाणवत असतील तेव्हा अँटीबायोटिक घ्यावे, पण जेव्हा डोळ्यांचा त्रास तीव्र स्वरुपाचा असेल तेव्हा ही दुसरी स्टेज समजावी. यावेळी अँटीबायोटिक स्टेरॉइड (Antibiotics with Steroid) घ्यावे. तिसऱ्या स्टेजमध्ये डोळ्यांची तीव्र वेदना, डोळे सुजणे, पापण्या सुजणे ही लक्षणे दिसली तर अँटीबायोटिक स्टेरॉइडसह (Antibiotics with Steroid) पोटातील औषधे (Oral Medicine) घ्यावी.

आय फ्लूची लक्षणे दिसताच एक घरगुती उपाय करावा (A home remedy should be taken as soon as the symptoms of eye flu appear)

पावसाळ्यात आय फ्लू पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशावेळी पावसाळ्यात पाण्याच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. सॅनिटायझरचा वापर करा. कोरोना काळात ज्याप्रमाणे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करायचो, त्याप्रमाणे तुम्ही आताही सॅनिटायझरचा वापर करू शकता. याशिवाय सार्वजानिक ठिकाणी वावरताना गॉगल वापरा. आय फ्लूपासून वाचण्यासाठी स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आय फ्लूची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तुमचा आजार किती गंभीर आहे, यावरून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावी.” स्वच्छ कापूस ओला करून त्याने डोळे पुसावे. यामुळे डोळ्यातील इन्फेक्शन बऱ्यापैकी कमी होऊ शकते.

आय फ्लू पसरू नये यासाठी काय करावे? (What to do to prevent the spread of eye flu)

पावसाळ्यात आय फ्लू पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशावेळी पावसाळ्यात पाण्याच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोना काळात ज्याप्रमाणे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करायचो, त्याप्रमाणे तुम्ही आताही सॅनिटायझरचा वापर करू शकता. याशिवाय सार्वजानिक ठिकाणी वावरताना गॉगल जरूर वापरा. आय फ्लूपासून वाचण्यासाठी स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे असते.
तसेच तुम्हाला आय फ्लूची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तुमचा आजार किती गंभीर आहे, यावरून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आवश्यक ती औषधे घ्यावीत .

हे ही वाचा:

पुन्हा एकदा Hrithik Roshan आणि Saba Azad ट्रोलिंगच्या भोवऱ्यात

मोहरमनिमित्त पुण्यातील वाहतुकीत उद्या होणार बदल

Welcome 3 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version