Monday, July 1, 2024

Latest Posts

अखेर प्रतीक्षा संपली!, Xiaomi 14 Civi हा शानदार फोन उद्या होणार लॉन्च

जर तुम्ही अनेक दिवसांपासून चांगल्या स्मार्टफोनच्या शोधात आहात, तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Xiaomi 14 Civi Smartphone will launch tommorrow : जर तुम्ही अनेक दिवसांपासून चांगल्या स्मार्टफोनच्या शोधात आहात, तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. Xiaomi आपला नवीन फोन उद्या म्हणजेच १२ जून ला लॉन्च करणार आहे, ज्याची चर्चा खूप दिवसांपासून होत आहे. या फोनचे नाव Xiaomi 14 Civi आहे, ज्यात उत्कृष्ट फीचर्स आहेत.

Xiaomi 14 Civi स्मार्टफोन कधी लाँच होईल?

Xiaomi 14 Civi स्मार्टफोन दिनांक १२ जून रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही Xiaomi चा फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, Xiaomi च्या या फोनमध्ये तुम्हाला Qualcomm चा पॉवरफुल प्रोसेसर Snapdragon 8s Gen 3 मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 GHz पर्यंत क्लॉक स्पीड मिळेल.

 

Xiaomi 14 Civi स्मार्टफोनचे तपशील

डिस्प्ले बद्दल बोलायचे झाले तर, या फोन मध्ये तुम्हाला 1.5K रिझोल्युशन सह डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या फोनचा कॅमेरा हा एक मोठा आकर्षण आहे. या फोनचा कॅमेरा Leica कंपनीच्या सहकार्याने बनवण्यात आला आहे. एक 50MP प्राइमरी सेन्सर आहे, यासोबत 50MP टेलीफोटो लेन्स देण्यात येईल, यामध्ये तुम्हाला मागील बाजूस 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा देखील मिळेल. जर आपण फ्रंट कॅमेराबद्दल बोललो तर यात 32 MP + 32 MP कॅमेरा सेटअप आहे. जे उत्कृष्ट सेल्फी काढण्यासाठी उपयुक्त ठरेल.

फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 4700mAh ची बॅटरी मिळत आहे. याशिवाय, तुम्हाला 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळतो. याचा अर्थ तुमचा फोन काही मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. हा फोन तुम्हाला 3 रंग पर्यायांमध्ये मिळेल, जे क्रूझ ब्लू, मॅचा ग्रीन आणि शॅडो ब्लॅक (Crusie Blue, Matcha Green, Shadow Black) आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग निवडू शकता.

हे ही वाचा:

तेव्हा Ashok Saraf यांना न सांगताच…महेश कोठारेंची कबुली

India-Pak Match ला उपस्थिती आणि आज निधन, MCA चा अध्यक्ष हरपला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss