शांत झोप लागण्यासाठी करा हे उपाय

शांत झोप लागण्यासाठी करा हे उपाय

झोप ही आरोग्यासाठी महत्वाची आहे. कमीतकमी ८ तास माणसाला झोप पाहिजे. पण आजकालच्या जीवनशैलीमुळे झोप पूर्ण होत नाही. शांत झोप लागण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो तरी देखील झोप लागत नाही. त्याचे असे कारण आपण आजकाल फोनचा जास्त वापर करतो, रात्रीचे जागरण करतो, आणि रात्री झोप पूर्ण न झाल्यास आपण सकाळी लवकर उठतो . त्यामुळे आपले दिनक्रम बदलते आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आरोग्यावर परिणाम झाल्यास आपण आजारांना निमंत्रण देतो. तर आज आम्ही तुम्हाला शांत झोप लागावी यासाठी काही उपाय सांगणार आहोत.

हे ही वाचा : घाम न आल्याने आरोग्यावर होतील घातक परिणाम जाणून घ्या कारणे

 

शांत झोप लागण्यासाठी उपाय –

शांत झोप लागण्यासाठी वेळेवर झोपणे वेळेवर खाणे. आजकालच्या जीवनात वेळेवर झोपणे कितीही कठीण असले. तरी प्रयत्न केल्यास काहीच अशक्य नाही. यासाठी वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा.

शांत झोप लागण्यासाठी झोपेचा अगोदर अंघोळ करणे त्यामुळे आपल्याला शांत आणि चांगली झोप लागते.

झोपण्याआधी तुम्ही आवडत्या व्यक्ती सोबत गप्पा मारा किंवा तुम्हाला आवडेल असे काही काम करा त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि शांत झोप लागेल .

 

तुम्ही ऑफिस मध्ये बसून काम करत असाल आणि तुमच्या शरीराची हालचाल होत नसेल तर तुम्ही वेळ काढून रोज नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे.

काही लोकांना वाचण्याची आणि लिखाण करण्याची सवय असते. तर तुम्ही झोपण्याआधी कथा , कांदबऱ्या किंवा तुम्हाला आवडणारी पुस्तके देखील वाचू शकता किंवा तुम्ही जर तुम्हाला कविता वगरे लिहण्याचा छंद असेल तर तुम्ही लिखाण देखील करू शकता .

शांत झोप लागण्यासाठी तुम्ही हलका आहार सेवन करणे.

रात्री झोपताना उशीरापर्यंत टि.व्ही. किंवा मोबाईल पाहणे कमी करा .

दिवसभर झोपून राहू नका काहींना काही काम किंवा वाचन करत राहावा किंवा तुम्हाला आवडणारे पदार्थ बनवा हे देखील तुम्ही करू शकता.

हे ही वाचा :

चहा कॉफी ऐवजी प्या ही पेय आणि आठवड्याभरात मिळवा चमकदार त्वचा

 

Exit mobile version