पोटा मधील सूज कमी करण्यासाठी या टिप्स फोल्लो करा

पोटा मधील सूज कमी करण्यासाठी या टिप्स फोल्लो करा

पोटा मधील सूज अनेक कारणांमुळे येते. अनेकदा पोटात सूज चुकीचे पदार्थ सेवन केल्याने देखील येते. या कडे दुर्लक्ष केल्यास पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते त्यामुळे पोटदुखी , पाठदुखी असे आजार होतात. कधी कधी बाहेरील पदार्थ अति सेवन केल्याने देखील पोटामध्ये सूज येते. पोटात सूज आल्यास आपल्याला अनेक समस्यांना समोर जावे लागते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून पोटावरील सूज कमी करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

हे ही वाचा :

 

पोटात सूज आल्यास दिसणारी लक्षणे –

मळमळ

उलट्या

भूक न लागणे

सतत उचकी येणे

रक्ताच्या उलट्या

काही लोकांचे पोट जास्त फुगलेले असते. तसेच पोट दुखण्याची बरेच कारणे आहेत. पोटात जास्त प्रमाणात गॅस झाल्यास पोटात सूज येते. किंवा चुकीच्या खाण्या पिण्यामुळे आणि मासिक पाळी मुळे देखील पोटात सूज येते. याकडे जास्त दुर्लक्ष करू नये दुर्लक्ष केल्यास ही समस्या खूप वाढू शकते.

 

जर तुम्हाला घाई घाई मध्ये खाण्याची सवय असेल तर ती टाळा. कारण जेव्हा आपण घाई घाई ने खातो तेव्हा आपण ते अन्न गिळतो. अन्न गिळल्यास पोटात गॅस तयार होतो. आणि त्यामुळे पोटात सूज येऊ लागते. म्हणून अन्न बारीक चावून खाणे.

काही लोकांना असे वाटे की जास्त प्रमाणात पाणी पिल्याने पोट फुगते. पण असे काही नसते. पाणी कमी प्रमाणात पिल्याने अनेक समस्या उद्भवतात. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही जास्त प्रमाणात पाणी सेवन केले पाहिजे.

जेवण झाल्यानंतर तुम्ही लगेच बसतात झोपतात असे कधीच करू नये. जेवण झाल्यास थोडे चाले पाहिजे. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते आणि पोटातील विकार देखील दूर होतात. आणि पोटात सूज वगरे येत नाही.

च्युइंगम जास्त खाऊ नये. जेव्हा आपण च्युइंगम खातो त्यावेळी पोटात हवा जाते. च्युइंगम मुळे पोटात सूज येते. म्हणून च्युइंगम खाऊ नये .

हे ही वाचा :

चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी, जाणून घ्या तुरटीचे फायदे

 

Exit mobile version