spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रदूषणापासून नुकसान होणाऱ्या त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा….

प्रदूषणापासून नुकसान होणाऱ्या त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा....

काही दिवसातच हिवाळा चालू होणार असून, वातावरणात बदल देखील बघायला मिळतोय, शहरांमध्ये प्रदूषण हे सगळीकडे पसरत असून हवेची गुणवत्ताही हळूहळू खालावू लागली आहे. असे असले तरी अजून थोड्या दिवसांनी हवेची गुणवत्ता आणखी बिघडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रदूषित हवेमुळे आरोग्य बिघाडते , पण त्याचसोबत त्वचेवर देखील या वाढत्या प्रदूषणाचा खूप वाईट प्रभाव होतो व त्वचा देखील डॅमेज होते, त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ,मुरुम आणि चेहऱ्यावर खाज यांसारख्या समस्यांना लोकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बिघडलेलं वातावरण आणि प्रदूषणापासून बचावासाठी प्रत्येकाने काही खास गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. प्रदूषण आणि बदलत्या हवामानाचा त्वचेवर परिणाम होऊ नये म्हणून यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची ते सांगणार आहोत.

चेहरा दिवसातून २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवा

प्रदूषित वातावरणामुळे चेहऱ्यावर खूप धूळ जमा होत असते, चेहऱ्यावर तेल जमा होऊन चेहरा तेलकट होतो. त्यामुळे चेहऱ्यावर अनेक समस्या उद्भवतात, त्यामुळे चेहरा वारंवार पाण्याने धुवून स्वच्छ करावा, दिवसातून २-३ वेळा चेहरा कोमट किंवा सध्या पाण्याने क्लीनसर किंवा फेसवॉश ने मसाज करून धुवावा आणि नंतर टॉवेलने चेहरा चांगला पुसून घ्या.

(Moisturiser) मॉइश्चरायझरचा वापर करा

चेहरा धुतला की चेहरा थोड्या वेळाने कोरडा होत जातो त्यामुळे तुमची स्किन ड्राय पडते, त्यामुळे चेहरा हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुमच्या स्किनप्रमाणे मॉइश्चरायझर निवडा आणि फेसवॉश झाल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर चेहऱ्यावर लावा.

(Sunscreen)सनस्क्रीनचा वापर करा

सनस्क्रीन तुमचा चेहरा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यास मदत करतं, त्यामुळे घरातून बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करा, हे सनस्क्रीन SPF ५०+ इतकं असावं जे तुमच्या चेहऱ्याची सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षा करण्यास मदत करतं.

चेहरा झाकण्याचा प्रयत्न करा.

जर तुम्हाला देखील प्रदूषणापासून तुमच्या चेहऱ्याचा बचाव करायचा असेल तर घराबाहेर पडताना नेहमी स्कार्फ बांधा.जर तुम्ही चेहरा झाकून बाहेर गेलात तर तुमच्या चेहऱ्यावर प्रदूषणाचा फारसा परिणाम होणार नाही तसेच तुमची त्वचा जास्त काळ मॉइश्चराईझ राहील.

हे ही वाचा : 

मराठी स्टार Mansi Naik ने टाईम महाराष्ट्रच्या दुर्गोत्सवात लालबागच्या दुर्गामातेचं दर्शन घेतलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटली आपली छोटीशी मायरा,पाया पडून घेतला आर्शिवाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss