spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Friendship Day 2023, या ‘फ्रेंडशिप डे’ ला मित्रमैत्रिणींना द्या ‘या’ खास भेटवस्तू

लवकरच मैत्री दिवस येणार आहे. हा दिवस पूर्णपणे मित्रमैत्रिनींना समर्पित केला जातो. हा दिवस अनेकजण आपल्या मित्रांबरोबर सेलिब्रेट करत असतात. भारतासह अनेक देशांमध्ये हा दिवस आनंदाने साजरा केला जातो.

लवकरच मैत्री दिवस येणार आहे. हा दिवस पूर्णपणे मित्रमैत्रिनींना समर्पित केला जातो. हा दिवस अनेकजण आपल्या मित्रांबरोबर सेलिब्रेट करत असतात. भारतासह अनेक देशांमध्ये हा दिवस आनंदाने साजरा केला जातो. भारतात हा मैत्री दिवस ६ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. बाकी सर्व नाती आपल्याला जन्मतःच मिळतात पण मैत्रीचे नटे असे आहे जे आपण स्वतः निवडतो. विचार जुळले की आपोआपच ती व्यक्ती आपली जिवलक व्यक्ती बनते. अशा जिवलग मित्रांना/ मैत्रिणींना या दिवशी काय भेटवस्तू द्यावे ते समजत नसेल, तर आज आम्ही फ्रेंडशिप डे निमित्ताने तुमच्यासाठी काही खास भेटवस्तूंची पर्याय घेऊन आलो आहोत.

फ्रेंडशिप बॅन्ड (Friendship Band)

फ्रेंडशिप बॅन्ड हा नावाप्रमाणेच मैत्रातील नात्याचे प्रतीक मानले जाते. अनेकजण फ्रेंडशिप डेला आपल्या मित्रमैत्रिणींच्या हातात हा फ्रेंडशिप बॅन्ड लावत असतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेंडशिप बॅन्ड उपलब्ध असतात. तुमचे बजेट कमी असल्यास तुम्ही तुमच्या मित्राला फ्रेंडशीप डेच्या दिवशी
फ्रेंडशिप बॅन्ड देऊन मैत्रीचा दिवस साजरा करू शकता.

​मेकअप प्रॉडक्ट (Makeup product)

मेकअप हा मुलींचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. मुलींना मेकअप करणे तसेच विविध मेकअप प्रॉडक्ट खरेदी करणे खूप आवडते. तुमच्या देखील एखाद्या मैत्रिणीला मेकअप विषयी अधिक प्रेम असेल तर मेकअप प्रॉडक्ट हे गिफ्टसाठी उत्तम पर्याय आहे. फ्रेंडशिप डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या मैत्रिणीला एखादे मेकअप प्रॉडक्ट भेट देऊ शकता. यासाठी एखाद्या चांगल्या ब्रँडचा पर्फ्युम, इयररिंग्स अथवा ब्रेसलेट असे अनेक पर्याय आहेत.

फोटो फ्रेम (Photo frame)

फ्रेंडशिप डेला मित्रांना काय भेटवस्तू द्यायची हे तुम्ही अजूनही पक्कं केले नसेल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे फोटो फ्रेम. मित्रांबरोबर एकत्र घालवलेल्या चांगल्या कशाचे फोटोज तुमच्यकडे नक्की असतील. असे फोटो एकत्रित करून एक फोटो फ्रेम तयार करा. आणि ही फोटो फ्रेम तुम्ही तुमच्या मित्रांना गिफ्ट म्हणून देऊ शकता. तसेच एखादी आठवणीतील डायरी देखील गिफ्टसाठी उत्तम पर्याय आहे.

गॅझेट किंवा दागिने (Gadgets or jewelry)

जर तुमचा मित्र गॅजेट्सचा शौकीन असेल तर तुम्ही त्याला फ्रेंडशिप डे ला तुम्ही कोणतेही गॅजेट गिफ्ट करू शकता. तुम्ही त्याला ब्लूटूथ स्पीकर, फिटनेस बँड, स्मार्ट घड्याळे, एअरपॉड्स इत्यादी भेट म्हणून देऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही तिला आर्टिफिशियल ज्वेलरीही गिफ्ट म्हणून देऊ शकता.

हे ही वाचा:

भाज्या खायला आवडत नाही? मग भाज्यांपासून बनवा Tasty Veggie Pancake

Shravan Special, उपवासाला बनवा भगरीचा खास पुलाव

संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा Crispy Poha Nuggets

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss