ऊस, बांबूच्या क्रॉकरीपासून ते पीठ-गुळाच्या भांड्यांपर्यंत, जाणून घ्या कागदाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या पर्यावरणपूरक पर्यायांबद्दल

युज अँड थ्रो विभागातील प्लॅस्टिक. जे एकदा वापरून फेकून दिल्यामुळे पृथ्वीवरील कचरा आणि प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदुषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

ऊस, बांबूच्या क्रॉकरीपासून ते पीठ-गुळाच्या भांड्यांपर्यंत, जाणून घ्या कागदाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या पर्यावरणपूरक पर्यायांबद्दल

काही महिन्यांपूर्वी भारत सरकारने सिंगल न्यूज प्लास्टिक वर बंदी घातली होती आणि ती बंदी अजूनही कायम आहे. सिंगल युज प्लॅस्टिक म्हणजे फक्त एकदाच वापरता येणारी प्लॅस्टिक उत्पादने. म्हणजे युज अँड थ्रो विभागातील प्लॅस्टिक. जे एकदा वापरून फेकून दिल्यामुळे पृथ्वीवरील कचरा आणि प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदुषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

सतत वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शेवटी भारत सरकारने अखेर प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. यात स्ट्रॉ, स्टरर, इअर बड, प्लास्टिकच्या फुग्यांना जोडलेले रॉड, प्लास्टिकची भांडी, सिगारेटची पाकीटं, प्रॉडक्टवरील पॅकेजिंग यांचा समावेश प्लॅस्टिक बंदित करण्यात आला होता. पण, सरकारच्या या निर्णयाचा लोकांवर काही फारसा परिणाम झाला नव्हता. भारतात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या भारताच्या या प्लॅस्टिक हटाओ धोरणाला अगदी मनापासून पाठिंबा देतात. चला जाणून घेऊया अशाच काही संस्थांबाबत:

भोगराजा यांनी बंगळुरू स्थित अर्थवेअर या कंपनीची २०११ मध्ये सुरुवात केली. संपूर्ण भारतातील टेबलवर उत्पादनांना पर्यायी उपाय म्हणून नैसर्गिक धाग्यांपासून विविध आकाराची भांडी ही कंपनी तयार करते.

उत्तर प्रदेशात वाढणारे प्लॅस्टिकचे प्रदुषण लक्षात घेऊन वेद कृष्णा यांनी ‘ चूक’ (chuk) या संस्थेची स्थापना केली. वेद कृष्णा यांची ही संस्था ऊसाच्या चोथ्यावर प्रक्रिया करून पर्यावरणपूरक भांड्यांची निर्मिती करते. जी मेक्रोवेव आणि फ्रीजमध्ये आरामात राहू शकतात.

प्लॅस्टिक नव्हे तर झाडांपासून भांडी तयार करण्याच्या उद्देशाने पॅपको ग्रीनवेअरची २०११ मध्ये सुरुवात करण्यात आली. ही संस्था ऊसाचा चोथा आणि बांबू फायबरपासून भांडी तयार करू शकते.

पूनिता दत्ता यांची आटावेअर बायोडिग्रेडेबल ही दिल्लीस्थित संस्था गहू, बाजरी, ज्वारी आणि मक्याच्या पिठापासून कप, बश्या आणि चमचे तयार करते. तसेच एक गंमतीदार गोष्ट म्हणजे ही भांडी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.

रोज वाढत जाणाऱ्या प्रदूषणामागे आपला हात आहे यात शंका नाही. ‘ग्लोबल वॉर्मिंग’, ‘क्लायमेट चेंज’ यासारख्या मोठ्या पर्यावरणीय समस्या या प्रदूषणाचा परिणाम आहेत जो आज जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. आज जागतिक पातळीवरील बैठकांमध्ये त्याच्या निराकरणावर गंभीर चर्चा होत आहे आणि त्यावर उपाययोजनाही केली जात आहे. परंतु समाधानाचे यश तेव्हाच शक्य आहे जेव्हा मानव आपले दैनंदिन जीवन सुधारेल. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सर्वजण मिळून आपल्या सभोवतालचे वातावरण पर्यावरणपूरक बनवतील.

हे ही वाचा:

पौष्टीक गाजर आणि बीट सॅलड रेसिपी जाणून घ्या

स्त्रियांमध्ये ‘या’ आजाराचा धोका जास्त आढळून येतो, जाणून सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version