वजन वाढतंय… करा ‘हे’ सोपे उपाय

वजन वाढतंय… करा ‘हे’ सोपे उपाय

शरीरासाठी सकाळी लवकर उठणे चांगले असते. वजन कमी करण्यसाठी काही जण जिम वैगेरे देखील करतात. तरीपण वजन नियंत्रित राहत नाही. सण सुध म्हटल्यावर जास्त प्रमाणात पदार्थ खाले जातात. त्यामुळे वजन नियंत्रित राहत नाही. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढू शकते. वजन वाढल्यास आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून वजन नियंत्रित कसे ठेवता येईल या बद्दल सांगणार आहोत.

हे ही वाचा : दिवाळीत सोने खरेदी करताय ? तर घ्या अशी काळजी…

 

आजकालच्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीरावर लक्ष ठेवता येत नाही. कधी कधी आपण जास्त प्रमाणात बाहेरचे पदार्थ सेवन करत असतो. त्यामुळे देखील वजन वाढण्यास मदत होते. वजन वाढल्यास तुम्हाला पॅनिक अटॅक येण्याची शक्यता असते. तसेच हृदयविकाराचा धोका देखील वाढू शकतो. वजन कमी करण्यासाठी सकाळी उठणे फार गरजेचे आहे.

झोपेतून उठल्यावर सर्वात आधी कोमट गरम पाणी पिणे. हे पाचन तंत्र स्वच्छ करण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत करते. सकाळी उठल्यावर ब्रश न करता कोमट गरम पाणीचे सेवन करणे. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

 

सकाळी उठल्यावर व्यायाम आणि योगासने करणे. शरीरासाठी व्यायाम आणि योगासने खूप गरजेचे असते. त्यामुळे वजन देखील नियंत्रित राहते आणि अनेक आजारांपासून देखील सुटका मिळते. तसेच सकाळी उठल्यावर शतपावली देखील करणे. ते देखील आरोग्यासाठी खूप उत्तम असते.

सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील सगळ्यात महत्वाच्या भाग आहे. तुम्ही जर`शेंगदाणे घालून पोहे, अंडी अशा पदार्थांचा नाश्त्यासाठी समावेश केला तर जास्तवेळ पोट भरल्यासारखं वाटेल. यामुळे बाहेरील पदार्थ खाणे टाळता येते. सकाळी उठल्यावर अंडी , फळ किंवा पौष्टिक अन्न पदार्थाचा समावेश करा त्यामुळे देखील वजन कमी होते. सतत भूक लागल्याने देखील वजन नियंत्रित राहत नाही. त्यामुळे खाण्या पिण्यावर कंट्रोल ठेवणे.

रात्री फोनचा वापर कमी करा आणि वेळेवर झोपा वेळेवर न झोपल्यास देखील वजन वाढण्यास मदत होते.

हे ही वाचा :  

घरामध्ये तुळस का असते ? घ्या जाणून माहिती

 

Exit mobile version