Ganeshotsav 2024 : तुमच्या मुलांना गणपती बाप्पाच्या केवळ कथाच नाही तर ‘या’ गुणांबद्दल सुद्धा सांगा…

Ganeshotsav 2024 : तुमच्या मुलांना गणपती बाप्पाच्या केवळ कथाच नाही तर ‘या’ गुणांबद्दल सुद्धा सांगा…

श्री गणेश हे सर्वांचेच लाडके दैवत आहेत. श्री गणेश हे बुद्धी, ज्ञान आणि कलेची देवता म्हणून ओळखली जाते. गणेश चतुर्थीच्या सणाला घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होतात. यावर्षी हा उत्सव ७ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. सर्वत्र गणेशोत्सव अगदी उत्साहात आणि आनंदात पार पडतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या उत्सवासाठी सर्व तितकेच उत्सुक असतात. या गणेश चतुर्थी निमित्त तुमच्या मुलांना गणपती बाप्पांचे सद्गुण शिकवा. जे त्यांना पुढील आयुष्यात नक्कीच कामी येतील.

आई वडील यांना सर्वस्व मानणे
तुम्ही गणपती बाप्पाची पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याची कथा मुलांना आजपर्यंत सांगत आला आहात. त्यातच गणपती बाप्पांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याऐवजी स्वतःच्या आईवडिलांनाच तीन प्रदक्षिणा मारल्या होत्या. म्हणजेच गणपती बाप्पा आपले संपूर्ण जग आपल्या आईवडिलांनाच मानतात हा बोध समजतो.

आईची सेवा
गणपती बाप्पांनी आपल्या आईचा शब्द पाळण्यासाठी नकळत परंतु साक्षात आपल्या वडिलांशी युद्ध केले होते. या कृतीतून त्यांच्यासाठी त्यांच्या आईचा शब्द हा अंतिम होता आणि त्यांचा कधीही अवमान होणार नाही असे पाहायला मिळते.

वडीलधाऱ्यांच्या आदर
गणपती बाप्पा हे त्यांच्या आईवडिलांचा शब्द कधीही खाली पडून देत नाही हा गुण मुलांना समजावला पाहिजे. त्यामुळे आपल्या आईवडिलांचा आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा सदैव आदर केला पाहिजे.

ज्ञानाच्या जोरावर यश मिळवणे
गणपती बाप्पा बुद्धी आणि ज्ञानाची देवता म्हणून ओळखली जाते. ज्ञान हा असा सागर आहे जिथे प्रत्येक अडचणी आणि संकटांना सामोरे जाण्याची हिम्मत असते. हा महत्वपूर्ण गुण तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलाच पाहिजे.

हार मानू नये
आपल्या सर्वांनाच गणपती बाप्पाच्या तुटलेल्या दाताबद्दल आणि हत्तीचे मुख लावले गेले याबद्दल सर्वच कथा ठाऊक आहेत. परंतु या शारीरिक समस्यांना त्यांनी आपल्या जीवनात कधी अडचण म्हणून पाहिले नाही तर सर्व परिस्थितीला अगदी चतुरपणे सामोरे गेले. हा गुण तुम्ही तुमच्या मुलांना शिकवला पाहिजे जेणेकरून ते आपल्या अडचणींना जीवनातील अडथळे समजणार नाहीत.

हे ही वाचा:

सप्तसूर म्युझिकतर्फे खास गणेशोत्सवानिमित्त नवा म्युझिक व्हिडिओ लाँच, यंदाच्या गणेशोत्सवात वाजणार ‘बोल बाप्पा बोल’
OTT Platform वर येणार आहेत ‘या’ नवीन क्राईम थ्रिलर वेब सीरीज…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version