Tuesday, July 2, 2024

Latest Posts

मुलींनी फॅशन स्टायलिश लुकसाठी ‘हे’ नक्की वाचा

मुलीं फॅशनेबल आणि आकर्षक दिसण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यासाठी त्या महागडे कपडे, ब्रँडेड शूज आणि स्टायलिश वॉर्डरोब याची नेहमीच खरेदी करत असतात. पण आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टींची गरज नाही, तर तुमच्या शरीराला आरामदायक आणि आत्मविश्वासपूर्वक वाटेल तेच कपडे घालणे गरजेचे आहे.

मुलीं फॅशनेबल आणि आकर्षक दिसण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यासाठी त्या महागडे कपडे, ब्रँडेड शूज आणि स्टायलिश वॉर्डरोब याची नेहमीच खरेदी करत असतात. पण आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टींची गरज नाही, तर तुमच्या शरीराला आरामदायक आणि आत्मविश्वासपूर्वक वाटेल तेच कपडे घालणे गरजेचे आहे. आजकाल सगळ्यांनाच ट्रेंड फॉलो करायला आवडतो. फॅशन आणि स्टाईल वाढवण्यासाठी तरुणाई वेगवेगळ्या युक्त्या अवलंबत असतात. मुली तर नेहमीच त्यांच्या वॉर्डरोबमध्ये सर्व प्रकारचे स्टायलिश कलेक्शन ठेवतात. आज आपण असाच काही स्टाईलबद्दल सांगणार आहोत, ज्याने तुम्हाला आरामदायक आणि आत्मविश्वासपूर्ण राहण्यास मदत होईल.

  • आजकाल मुलींना शॉर्ट्स आणि टी-शर्ट्स घालणे आवडते, उन्हाळ्याच्या दिवसात तर हा एक अतिशय आरामदायक पोशाख असतो. आता तर अधिक ट्रेंडी करणारी गोष्ट म्हणजे शग. कोणत्याही प्रकारचे लांब शग तुम्हाला पूर्ण स्टाईल देईल.
  • बहुतेक मुली वेस्टर्न ड्रेसेस घालताना दिसतात. पण जर तुम्ही साधा ड्रेस कॅरी करत असाल आणि त्यात एक स्टायलिश टच हवा असेल तर त्यासोबत बेल्ट वापरा. बॉडीकॉन किंवा मॅक्सी ड्रेससोबत वेगवेगळ्या स्टाईलचे बेल्ट वापरून तुम्ही स्टाईल मिळवू शकता.
  • बाजारात अनेक प्रकारच्या जॅकेटची फॅशन आलेली दिसते. जे तुम्हाला क्लासी लूक देते ते म्हणजे डेनिम जॅकेट. तुम्ही हे जॅकेट कोणत्याही कुर्ती, टॉप आणि शर्टसोबत घालू शकता. कोणत्याही ऋतूमध्ये या जॅकेटला प्राधान्य दिले जाते.
  • आजकाल बाजारात अनेक पॅन्टचे प्रकार आले आहेत, जे प्लाझो लूकची आहेत, ती दिसायला स्टायलिश आहेत तितकीच ते घालायला आरामदायक आहेत. तुम्ही यासोबत शर्ट, टॉप, टी-शर्ट किंवा कुर्ती असेही कॉम्बिनेशन करू शकता. ऑफिसमध्ये जाताना नवीन लूकसाठी तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता.
  • पॅन्टसूट आणि जंपसूटची फॅशन ही काळासाठी जाते पण ते कधीच जुने होत नाही. तुम्ही ते कधीही घालू शकता आणि कोणत्याही प्रासंगिक प्रसंगासाठी त्यांना स्टाईल करू शकता.
  • कॅज्युअलसह स्टायलिश लूक कसा मिळवायचा हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत स्टाईल मिळवण्यासाठी मॅचिंग जीन्स वापरून पहा. जर तुम्ही या जीन्स कोणत्याही प्रकारच्या बॉडीकॉन टॉपसह कॅरी केल्यात तर तुम्ही अगदी छान दिसाल.

हे ही वाचा:

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला, अशोक सराफ – माधव अभ्यंकर यांच्यात रंगणार पराकोटीचा संघर्ष

India Final Scenario in T20 World Cup 2024 : उपांत्य फेरीत पाऊस पडला तर भारतीय संघ बाहेर पडणार? जाणून घ्या सविस्तर माहिती…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss