लहान मुलांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे पेय द्या…

लहान मुलांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे पेय द्या…

लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. रोगप्रतिकार शक्ती मजबूत असल्यास कोणतेही आजार लहान मुलांपासून दूर राहतात . इम्यूनिटी मजबूत करायची असेल तर छोट्या आजरांपासून दूर राहणे गरजेचे आहे. इम्यूनिटी मजबूत असल्यास कोणत्याही रोगामुळे होणारे जीवाणू, यांच्याशी लढण्याची क्षमता मिळते. यासाठी शरीरातील इम्यूनिटी ही मजबूत असणे गरजेचे आहे. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून लहान मुलांमधील इम्यूनिटी वाढवण्यासाठी कोणते पेय द्यावी लागतील या बद्दल सांगणार आहोत.

लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लहान मुलांना फळे , हिरव्या पालेभाज्या , पोषक तत्वांनी असलेले पदार्थ सेवन करायला द्यावी यामुळे शरीरातील रोग प्रतिकार वाढण्यास मदत होते. आजकालच्या मुलांना नुसती फळे किंवा अजून कोणते पदार्थ सेवन करायला आवडत नाही. त्यासाठी तुम्ही त्यांना काही पेय देखील देऊ शकता. जे आवडीने सेवन करतील. चला तर मग जाणून घेऊया लहान मुलांना कोणते पेय द्यावी.

 

लहान मुलांची रोगप्रतिकर शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही त्यांना हळदीचे दूध देखील देऊ शकता. हळदीच्या दुधाला सोनेरी दूध देखील म्हणतात. हळदीच्या दुधामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल असे गुणधर्म आढळून येतात जे मुलांना आजारांपासून वाचवण्यास मदत करते. रोगप्रतिकार शक्ती वाढल्यास बदलत्या ऋतूमुळे होणारी समस्या म्हणजे सर्दी, खोकला या पासून लगेच आराम मिळतो, आणि रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

तुळशी मध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे हिवाळयात रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही काढा देखील बनवू शकता. सर्वप्रथम पाण्यात तुळशीची पाने, दालचिनी पावडर, काळी मिरी पावडर, आले, काही मनुके आणि गूळ घालून उकळून चांगले घ्या, अशाप्रकारे काडा बनवून मुलांना द्या.

लिंबू मध्ये सी आणि ए जीवनसत्त्वे असतात त्याबरोबर जास्त प्रमाणात पोषक घटक देखील असते. जे अनेक रोगांपासून बचाव करण्यास मदत करते. तसेच तुम्ही मुलांना संत्री, सफरचंद, पेरू, या पासून रस बनवून देखील देऊ शकता.

हे ही वाचा :

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

 

Exit mobile version