लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर आणि आजारांवर ‘हा’ रामबाण उपाय

लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर आणि आजारांवर ‘हा’ रामबाण उपाय

जायफळ हा सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे. तसेच जायफळ हा मसाल्यांमध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे. जायफळाच्या चवीने पदार्थ देखील खूप चविष्ट बनतात. जायफळ हा पदार्थ जास्त करून गोडाच्या पदार्थमध्ये वापरला जातो. तसेच जायफळाचे अनेक फायदे आहेत. लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास जायफळ खायाला देतात. तसेच जायफळमध्ये अनेक औषधी गुण असतात. पेन रिलिव्ह, पोटाचे दुखणे, शरीरातील घाण काढणे, रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे व दातांची निघा राखणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे, त्वचा चमकावणे असे अनेक कार्य करते. तर जाणून घेऊया लहान मुलांसाठी जायफळाचे काय फायदे आहेत.

हे ही वाचा : तुम्ही लठ्ठ आहात तर जाणून घ्या आजाराबद्दल माहिती

 

जायफळचे फायदे :

मुलांची रोगप्रतिकारशक्ती खूप नाजूक असते. अशा वेळी त्यांना थंडीमध्ये सर्दी खोकल्याचा जास्त त्रास होतो. सर्दी झाल्यास लहान मुलांना जायफळ दिल्यास त्यांना लगेच आराम मिळतो. जायफळात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आढळतो, ज्यामुळे संसर्ग दूर होतो. जायफळ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. जायफळ बारीक वाटून त्यामध्ये मध मिक्सकेल्यास आणि ते लहान मुलांना दिल्यावर त्यांना लगेच सर्दी खोकल्यापासून त्यांना आराम मिळतो.

लहान मुले आणि मोठ्यांना देखील अपचनाची समस्या असते. जायफळ खाल्ल्याने अपचनात मदत होते. जायफळ मधात मिक्सकरून मुलांना खायाला दिल्याने पोटदुखीची समस्याही दूर होते. यामुळे चयापचय देखील चांगले होते.

 

मुलांना तोंड आल्यास खाणे-पिणे खूप कठीण होऊन जाते. या समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही बाळाला जायफळ देखील देऊ शकता. जायफळ आणि साखर मिक्सकरून तुम्ही आणि ते मिश्रण त्यांना द्या लगेच आराम जाणवेल आणि पोट देखील थंड होईल.

लहान मुलांचे कान दुखत असेल तर तुम्ही त्यांना जायफळ देऊ शकता. जायफळमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात , त्यामुळे कानदुखी कमी होते. तसेच जायफळ मध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने कानाची घाण साफ होते. जायफळ बारीक करून त्याची पेस्ट कानाच्या मागे लावा. यामुळे कान दुखणे आणि सूज कमी होईल.

दुधात जायफळ घालून मुलांना दिल्यास भूक वाढण्यास मदत होते. मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत होते. जायफळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. मुलाची भूक वाढवण्यासाठी जायफळ खायला द्या.

हे ही वाचा :

जाणून घ्या तांब्याच्या भांड्यात साठवलेले किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

 

Exit mobile version