Hair Care Tips: केस ओले ठेऊन झोपल्यास उद्भवू शकताता ‘या’ समस्या

आपल्यापैकी अनेक लोक रात्री केस धुणं (hair wash) टाळतात. मात्र आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सकाळी कामाच्या गडबडीत केस धुवायला वेळच मिळत नाही. याच कारणामुळे अनेक लोक संध्याकाळी किंवा रात्री केस धुतात.

Hair Care Tips: केस ओले ठेऊन झोपल्यास उद्भवू शकताता ‘या’ समस्या

आपल्यापैकी अनेक लोक रात्री केस धुणं (hair wash) टाळतात. मात्र आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सकाळी कामाच्या गडबडीत केस धुवायला वेळच मिळत नाही. याच कारणामुळे अनेक लोक संध्याकाळी किंवा रात्री केस धुतात. मात्र यामुळे केस लवकर नीट वाळत नाहीत व तसेच अर्धवट ओले केस (wet hair) घेऊन झोपावं लागतं. पण ओले केस घेऊन झोपण्याची ही सवय तुमच्या केसांसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही (bad for hair & health) नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी केस नीट वाळवून झोपले पाहिजे. अन्यथा त्रास सहन करावा लागू शकतो.

ओले केस ठेऊन झोपल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या –

केस ओले ठेवून झोपल्यास टाळूवर बुरशीजन्य संसर्ग (इन्फेक्शन) होण्याचा धोका वाढतो. यामुळे त्वचारोग आणि कोंडा अशा समस्या उद्भवू शकतात. यीस्ट हे शरीराच्या ओलसर ठिकाणी सहजपणे वाढते. यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोकाही वाढू शकतो.

रात्री झोपताना केस ओले राहिल्यास आपले केस कमकुवत होतात व त्यामुळे केस अधिक तुटतात. जेव्हा आपण केस घट्ट बांधतो किंवा केस ओलसर असतात तेव्हा ते खूप तुटतात. त्यामुळे निरोगी केसांसाठी केस ओले ठेवून झोपणे टाळावे. ते पूर्ण वाळवून मगच झोपावे.

केस ओले असताना झोपल्यास केसांचे नुकसान तर होतेच शिवाय आपल्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. ओल्या केसांमध्ये झोपल्याने सर्दी होऊ शकते. एका अभ्यासानुसार, रात्री ओले केस घेऊन झोपल्याने शरीराचे तापमान कमी होऊ शकते. याचा आपल्या प्रतिकारशक्तीवर खूप वाईट परिणाम होतो.

केस ओले ठेवून झोपल्याने आजारी पडण्याची भीती असते. एसी सुरू असेल वा थंडीच्या दिवसात तुम्ही केस ओले असताना झोपलात तर सर्दी, पडसे होण्याची शक्यता असते.

ओले केस ठेवून झोपल्याने रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.

दमट आणि ओले केस यामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे कल्पना करा की ओले केस ठेवून तुम्ही उशीवर झोपलात तर किती बॅक्टेरिया निर्माण होतील

यामुळे केसांमध्ये अधिक कोंडाही होऊ शकतो. ओले केस असल्याने केसांमध्ये दमटपणा अधिक राहतो यामुळे केसांमध्ये अधिक कोंडा होण्याची शक्यता असते.

हे ही वाचा :

मुख्यमंत्री, उद्योग आणि कृषी मंत्र्यांचं नाव काय गद्दार; आदित्य ठाकरे

WhatsApp Update : व्हाट्सअँपने यूजर्सला दिली ‘हि ‘ खास भेट; घ्या जाणून

Thackeray Vs Shinde : सिल्लोडमध्ये ठाकरे-शिंदेच्या सभेची चर्चा, आदित्य ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स पाहिले का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version