केसाला तेल लावताय ? या गोष्टी कधीच करू नका

जेव्हा आपण आपल्या केसांची योग्य काळजी घेतो तेव्हा आपले केस दाट, लांब आणि चमकदार होतात. वर्षानुवर्ष लोक केसांना तेल लावतात. तेल लावल्यानंतर काही चुका केल्याने तुमचे केस गळू शकतात. 

केसाला तेल लावताय ?  या गोष्टी कधीच करू नका

आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची की तेल लावल्यामुळे केसांची वाढ होते. केसांच्या आरोग्यासाठी तेल निश्चितच फायदेशीर आहे. मात्र त्यासोबत असलेले काही समज गैरसमज कमी करणेदेखील गरजेचे आहे. तेल केसांच्या मूळांना लावून हळूवार मसाज करावा. ते केसांमध्ये आपोआप शोषले जातात. चमचाभर गरम केलेले तेल पुरेसे आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. रात्रभर केसांमध्ये तेल ठेवल्याने विशेष फायदा होणारच हे खरं नाही.

केस निरोगी ठेवण्यासाठी पोषक घटकांचीगरज असते. जेव्हा आपण आपल्या केसांची योग्य काळजी घेतो तेव्हा आपले केस दाट, लांब आणि चमकदार होतात. वर्षानुवर्ष लोक केसांना तेल लावतात. तेल लावल्यानंतर काही चुका केल्याने तुमचे केस गळू शकतात.

१. केसाला जास्त वेळ तेल लावू नका

बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की केसांमध्ये तेल जितके जास्त वेळ ठेवले जाईल तितके केसांना अधिक फायदे होतील. पण असे केल्याने केस खराब होतात. केसांवर धूळ आणि घाण सहज जमा होते. त्यामुळे १ तासांपेक्षा जास्त वेळ तेल केसांवर लावून ठेवा.

२. लगेच कंगवा फिरवू नका 

तेल लावल्यानंतर कधी लगेच केसांवर कंगवा फिरवू नका. तेल लावल्यानंतर केस मऊ होतात त्यामुळे केसांना तेल लावल्यानंतर त्यांना कंगवा केल्यानंतर केस गळू लागतात. त्यामुळे केस असे लगेच विचरु नका.

३. लगेच केस धुवू नका

डोके धुतल्याने केसांना पुरेसे पोषण मिळत नाही. त्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे केसांना तेलाने मसाज केल्यानंतर लगेच डोके धुवू नये. तेल डोक्यावर किमान अर्धा तास राहू द्या. त्यानंतर तुमचे केस धुवा.

४. केस घट्ट बांधून ठेऊ नका

केसांना तेल लावल्यानंतर केस घट्ट बांधू नयेत. कारण तेल लावल्यानंतर केस नाजूक होतात आणि बांधल्याने केसांवर दबाव येतो. ते तुटण्याची शक्याता जास्त असते
खूप जणांना हे माहित नसते त्यामुळे अनेकदा असे केल्याने तुमच्या केसांना इजा पोहोचते.

Exit mobile version