आरोग्यदायक हळदीचे फायदे आणि तोटे…

आरोग्यदायक हळदीचे फायदे आणि तोटे…

हळदीचा वापर रोजच्या आहारामध्ये केला जातो. तसेच हळद ही औषधी सुद्धा आहे. हळदीचा वापर सर्दी खोकल्याच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. तसेच हळदीचा वापर आपण जखमेवर करू शकतो. हळदीचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच चेहऱ्यावर देखील आपण हळद लावू शकतो आणि आपले सौंदर्य देखील वाढण्यास मदत होते.

हे ही वाचा : साबुदाणा खरेदी करताय… ? मग या बाबी नक्की लक्षात घ्या

 

हळदीचे फायदे –

सर्दीमध्ये तुम्ही हळदीचा वापर करू शकता.

गरमदुधामध्ये मिक्सकरून देखील तुम्ही हळदीचे सेवन करू शकता त्यामुळे अंगदुखी वगैरे होत नाही.

पोटदुखी असेल तर तुम्ही २५० मिली पाण्यात १०० ग्रॅम हळद उकळा आणि थोडे थोडे करून पिया. त्यामुळे पोटदुखी थांबते.

जर तुम्हाला जखम झाली असेल तर तुम्ही हळदीचा वापर करू शकता. हळदीमुळे जखम लवकर ठीक होते.

तेलकट चेहरा असल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात त्यासाठी तुम्ही हळदीचा देखील वापर करू शकता. हळद तुम्ही दुधाच्या साईमध्ये मिक्सकरून देखील चेहऱ्यावर लावू शकता. त्यामुळे तुमचे सौंदर्य वाढेल.

 

हळद कोणी सेवन करू नये –

काविळीच्या रुग्णांनी हळदीचे सेवन करू नये. जर तुम्हाला हळदीचे सेवन करायचे असेल तर आधी डॉकटरचा सल्ला घ्या.

ज्या लोकांची पचनक्रिया बिघडलेली असून त्यांना बद्धकोष्ठता, पोटात गॅस, पोट फुगण्याची समस्या, छातीत जळजळ किंवा ऍसिड रिफ्लक्स, अपचन आदी समस्या आहेत त्यांनी देखील हळदीचे दूध सेवन करू नये. अशा परिस्थितीत हळदीचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

नाकातून रक्तस्त्राव असल्यास हळदीचा वापर करू नये. ज्या लोकांच्या नाकातून सतत रक्त वाहत असते त्यानी हळदीचे सेवन करू नये.

ज्या लोकांना एनिमिया हा आजर आहे त्यांनी अजिबात हळदीचे सेवन करू नये. त्यांनी कमी प्रमाणात हळदीचे सेवन केले पाहिजे .

ज्या लोकांना किडणी स्टोनची समस्या आहे, त्यामुळे किडणी स्टोनची समस्या असेलल्या लोकांनी हळद कमी प्रमाणात खावी.

हे ही वाचा :

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात धाव

 

Exit mobile version