Thursday, July 4, 2024

Latest Posts

Ginger Tea:आल्याचा चहा आरोग्यासाठी वरदान

सर्दी आणि खोकला हे प्रामुख्याने दिसून येणारे आजार आहेत. अशावेळी आल्याचा चहा प्यायल्याने पावसाळ्यातील अनेक समस्यांपासून नक्कीच आराम मिळतो.

पावसाळा म्हंटले की , एका हातात गरमगरम भजी आणि दुसऱ्या हातात गरम आलं घातलेला चहा हे कॉम्बिनेशन तर सर्वत्र पाहायला मिळते. पावसाळा आला की, त्या लोकांनाही आल्याचा चहा प्यायला आवडतो जे कधीही चहा पित नाही. नुकताच पावसाला सुरुवात झाली आहे आणि कधी ऊन, कधी पाऊस तर कधी अचानक वातावरणातील बदल यामुळे आजारपणांनाही सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सर्दी आणि खोकला हे प्रामुख्याने दिसून येणारे आजार आहेत. अशावेळी आल्याचा चहा प्यायल्याने पावसाळ्यातील अनेक समस्यांपासून नक्कीच आराम मिळतो. याशिवाय तुमच्या शरीरात ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. आल्याचा चहा खरचं इतका फायदेशीर आहे का? हे जाणून घेऊया तसेच आल्याचा उत्तम चहा कसा केला जातो याचीही रेसिपी आपण पाहुयात.

  • आल्यामध्ये नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट असतात. जे पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यातील अँटी – मायक्रोबियल घटक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. हे शरीरासाठी अँटिसेप्टिक म्हणूनही काम करते.
  • आल्याचा चहा वजन कमी करण्यास फायदेशीर मानला जातो. आलं हे तुमची भूक नियंत्रित करून तुमच्या शरीरातील उष्णता वाढवण्यास मदत करते.
  • उच्च रक्तदाबाचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज आल्याच्या चहाचे सेवन केले तर त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आल्याचा चहा हे सर्वोत्तम पेय आहे.
  • आल्यामध्ये क्रोमियम मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. जे रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी मदत करते.
  • डोकेदुखी आणि मायग्रेनच्या समस्येने टत्रस्त असलेल्यांनी आल्याच्या चहा प्यायल्याने डोकेदुखी कमी होते आणि फ्रेश, ताजेतवाने वाटू लागते.
  • आल्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असून शरीराबाबत अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते. प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते शरीरावरील सूज कमी करण्यापर्यंत आल्याचा उपयोग करून घेते येवू शकतो.

आल्याचा चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य (४ कप चहासाठी)

  • पाणी – २ कप
  • दूध – २ कप
  • साखर – ३ आणि १/२ टी स्पून
  • चहापावडर – २ टी स्पून
  • किसलेले आलं- २ टी स्पून
  • वेलची पूड- १/२ टी स्पून
  • दालचिनी- छोटा तुकडा
  • लवंग- ४

सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चहापावडर आणि साखर टाकून ६ ते ७ मिनिटे उकळायला ठेवा. नंतर त्यात किसलेले आलं, वेलची पूड, दालचिनी आणि लवंग घाला. एक मोठी उकळी आली की त्यात दूध घालून उकळून द्या. दूध आणि पाणी एकजीव झाले की गॅस बंद करा. चहाच्या गाळणीने चहा गाळून घ्या.

हे ही वाचा :

Parna Pethe च्या ‘विषय हार्ड’ चा ट्रेलर रिलीज…

Supriya Sule Birthday: पक्षीय फूट झाल्यानंतर देखील मोठ्या संयमाने त्यांनी…Jitendra Awhad यांच्या अनोख्या शुभेच्छा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss