spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

lemon आरोग्यास लिंबू गुणकारी फायदे

lemon : लिंबू (lemon) हे आपल्या रोजच्या आहारातील फळ आहे. लिंबू जितके आंबट असते तितकेच ते आरोग्यवर्धक असते. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर व्हिटॅमीन सी (Vitamin C) , बीकॉम्पेक्स (Bcompex), कॅल्शीयम (calcium) , आयर्न (Iron) सामावलेले असतात. तसेच लिंबू (lemon) आरोग्यासाठी वरदान आहे. लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबत लिंबाचे सेवन करणे शरिराला फायदेशीर ठरते. दिवसाची सुरुवात लिंबूपाणी घेऊन करावी. यामुळे त्वचा खुलून दिसते, पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अनेक इतर समस्यांपासून सुटका होते. लिंबात अनेक औषधी गुणधर्म असल्याने लिंबाचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. अनेक आजारात घरच्या घरी लिंबाचे उपाय केले जातात. लिंबू हे त्वचेशी संबंधित समस्या दूर करणारे नैसर्गिक अँटी सेप्टीक औषध आहे.

दात दुखत असल्यास त्या ठिकाणी लिंबू (lemon) घासणे किंवा लिंबाचा रस (lemon juice) लावणे असे केल्याने दातांचे दुखणे थांबण्यास मदत होईल. आणि दातांचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होईल. तसेच लिंबाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

 

हृदयरोग्यांसाठी लिंबूपाणी रामबाण औषध आहे. यामध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने उच्च रक्तदाब, मळमळ आणि भीती तसेच मानसिक तणावही दूर होतो. तसेच गळ्याचा संसर्ग दूर करण्यासाठी लिंबू गुणकारी आहे. गळ्याशी संबंधित समस्या किंवा टॉन्सिल्सची समस्या असल्यास लिंबामुळे खूप फायदा होतो

जर तुम्हाला ब्रद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर सकाळी उठून लिंबू पाणी पिणे, असे केल्याने ब्रद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल आणि पचनक्रिया देखील सुधारेल. आयुर्वेदामध्ये लिंबाचे अनेक फायदे आहेत.

शरीरात आयर्नची कमतरता असल्यास एनीमियाची समस्या उद्भवते, आणि लिंबू एनीमियाची समस्या दूर होण्यापासून बचाव करते. लिंबू हे आजराच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवते.

लिंबाचे सेवन केल्याने किंवा लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेण्यास मदत होते, कारण लिंबू मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss