आरोग्यासाठी फायदेशीर पपईचे पानं

आरोग्यासाठी फायदेशीर पपईचे पानं

पपईचे पाने हि आपल्याला अनेक आजरांपासून संरक्षण करतात. पपईच्या पानांचे सेवन केले पाहिजे. पानांमध्ये खूप औपचारिक गुणधर्म आहे. डेंग्यू हा आजार झाल्यास डॉक्टर पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला देतात. पानांमध्ये डेंग्यूचा प्रभाव कमी करण्याची क्षमता असते. डेंग्यू झाल्यास शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात. तसेच अशक्तापणा देखील वाटतो. रस पिल्याणे पेशी वाढण्यास मदत होते. पपईचा रस पिल्यास मधुमेह कर्करोग या सारख्या आजार नियंत्रित आहते. पपईच्या पानांमध्ये आणि फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात. कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

हे ही वाचा :‘ती बाई आम्हाला काय शिकवणार?’ चंद्रकांत खैरेची टीका

 

पपईचा पानांचा रस – पपईचे पाने मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि त्यामध्ये थोडे पाणी घाला. त्यात थोडे मीठ आणि साखर घालून मिक्स करून घ्या. पपईचा रस तयार होईल.

मधुमेह – रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी पपईचा रस पिणे. रस पिल्याणे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.

 

कर्करोग – कर्करोगावर पपईचे पाने अत्यंत फायदेशीर असतात. ज्याने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. तुम्ही कर्करोग टाळण्यास पपईची कच्ची पाने ही खाऊ शकता. किंवा रस सुद्धा पिऊ शकता.

पचनसंस्था – पपईच्या पानांचे सेवन केल्याने पोटातील जळजळ, गॅस यासारख्या समस्या निर्माण होत नाही. पानांचे सेवन केल्यास पचनसंस्था चांगली होते.

केसगळती – पपईची पाने खाल्याने केस घनदाट आणि केस वाढण्यास मदत होते. डोक्यातील कोंडा जाण्यासाठी पाने काम करतात.

हे ही वाचा :

 

उद्धव ठाकरे यांनी काय केलं हे मला माहित नाही – गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

 

Exit mobile version