तुरीच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे…

तुरीच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे…

आरोग्यासाठी तुरीच्या डाळीचे खूप फायदे आहेत. पण तुरीची डाळ जास्त प्रमाणात खाऊ नये. नाहीतर आरोग्यावर वाईट परिणाम होतील. कोणतीही डाळ खाऊ शकतो आणि ती आरोग्यासाठी उपयुक्तच असते. तूर डाळीमुळे वजन नियंत्रित राहते. तसेच तुरडाळीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, तांबं, सेलेनियम, मॅंगनीज आणि प्रथिनं हे घटक आढळतात. तसेच तुरडाळी मुळे पचनक्रिया देखील सुधारते. चला तर मग जाणून घेऊया तूर डाळीचे फायदे.

हे ही वाचा: घरच्या पद्धतीने बनवा रव्याच्या शंकरपाळ्या

 

जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित ठेव्याचे असेल तर तुम्ही तूर डाळीचे सेवन करू शकता. कारण तूरडाळीचे सेवन केल्याने पोट भरल्यासारखे राहते. आणि भूकेवर देखील नियंत्रण राहते. तूर डाळीमुळे पोटातील चरबी कमी करण्यास मदत होते. म्हणून आरोग्यासाठी तूर डाळ खूप फायदेशीर आहे.

हृदयाच्या आरोग्यासाठी तुरीच्या डाळीचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर असते. त्यात पोटॅशिअम असते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहाण्यास मदत होते. पोटॅशिअम मुळे रक्तवाहिन्याचा स्रोत चांगला राहतो. शरीराचा रक्तदाब योग्य राहातो आणि हृदयविकाराशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

 

पचनक्रिया निरोगी असल्यास आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतात. त्यासाठी आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश असणे फार गरजेचे आहे. पचनासाठी तंतुमय पदार्थ आहारात अधिक प्रमाणात असतील तर पोटात वायू होणे, पोटदुखी, बद्धकोष्ठता या सारख्या समस्या दूर करता येतात. फायबर म्हणजे पचनयोग्य तंतुमय पदार्थांसाठी तुरीची डाळ एकदम चांगली असते.

जर तुम्हाला रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर तुम्ही तुरीच्या डाळीचे सेवन करू शकता. तूर डाळीमध्ये इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. आणि मजबूत देखील ठेवते.

तूर डाळीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही तूर डाळीचे सेवन करू शकता. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. तसेच तूर डाळी मध्ये पोटेशियम असते ते देखील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

महाराष्ट्रीयन लोकांमध्ये तूरडाळीच्या आमटी म्ह्णून खूप वापर करतात.

हे ही वाचा:

Resume : उत्तम बायोडेटा कसा तयार करावा ?

 

Exit mobile version