spot_img
Saturday, September 14, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Health is Wealth : आयुर्वेदातील ‘हे’ पदार्थ दुधात मिसळल्यास; आजारांवर होतो परिणाम !

मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा आपण आपल्याकडे लक्ष देणे कमी करतो. याचा परिणाम हा फार दूरगामी होतो. या दैनंदिन जीवनात स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला काही आजार हे सुरुवातीला अगदीच चुटे समजतो. पण ते पुढे जाऊन प्रचंड त्रासदायक ठरू शकतात. यासाठी स्वतः कडे लक्ष देणं फार गरजेचे आहे. काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याया वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन तुम्ही निरोगी राहण्याचा प्रयत्न करु शकता.

आपल्याला अनेक औषधी वनस्पती माहिती आहेत, मात्र जर त्या दुधात मिसळल्या तर त्याचे फायदे दुप्पट होतात याची अनेकांना कल्पना नसते. आयुर्वेदात म्हणल्याप्रमाणे, औषधी वनस्पती कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, शरीराच्या विविध वेदना आणि स्नायूंचा थकवा यांसारख्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या वनस्पती आहेत ज्या दुधात मिसळल्या की त्याचा फायदा दुप्पट होतो.

  • हळद आणि दूध :

हळद ही एक अशी औषधी वनस्पती आहे जी दुधात मिसळल्यास शरीरातील दुखणी तसंच जखमा दूर होतात. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते जे अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करतं. हे कर्क्यूमिन अँटीइफ्लामेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. ज्यामुळे वेदना कमी करण्यास, स्नायूंना आराम करण्यास आणि रोगांपासून बरे होण्यास मदत करते.

  • दूध आणि अश्वगंधा :

अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी शरीरासाठी फायदेशीर असतं. यामुळे ताण-तणाव कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. अश्वगंधाचा खास गुण म्हणजे शरीराला आराम मिळण्यास मदत होते. यामुळे झोप, स्मरणशक्ती, स्नायूंचं आरोग्य स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

  • दूध आणि केशर :

स्टॅमिना वाढवायचा असेल दुधामध्ये केशर मिसळा. केशरमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे हार्मोनल आरोग्य सुधारण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास फायदेशीर असतात. सतत मूड स्विंग होणाऱ्या व्यक्तींनाही याचा फायदा होतो.

  • दूध आणि ड्रायफ्रूट्स :

कोजागिरीर पौर्णिमेला या दुधाचे विशेष सेवन केले जाते. हे दूध आरोग्याच्या दृष्टीने अधिकाधिक फायदेशीर असते. बौद्धिक विकासाला यामुळे चालना मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरातील शक्ती वाढण्यास मदत सुद्धा होते. हे दूध लहान मुलांना दिल्याने त्यांच्या शारीरिक विकासाला चालना मिळते.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss