spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Health Tips : लठ्ठपणा एक रोग ; देतो अनेक आजारांना आमंत्रण

लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट (Dieat Chart) योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही छोटे छोटे उपाय सांगत आहोत ज्यामुळे ७ दिवसात तुमचे वजन कमी होऊ लागेल.

  •  पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
  • दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.
  • पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.
  • वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.
  • आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.
  • दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी ४ किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री ८.३० नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.
  • जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीt तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट , एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.
  • वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ (डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.
  • दिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ सेवन करू नयेत.
  • सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.

हे ही वाचा:

Womens Asia Cup 2024: आशिया कपमधील भारतीय महिला संघाचे स्थान ठरणार अढळ

Maharashtra Vidhanparishad Election : “मी शपथ घेतो/घेते की..” ; विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss