spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Oil Free Recipe: तेलाचा एकही थेंब न वापरता आरोग्य ठेवा निरोगी

एकीकडे कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण आणि हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे. तिथे पर्याय म्हणून हेल्दी किंवा तेलविरहित नाश्ता करण्याकडे आजकाल सगळ्यांचा कल आहे. आज आपण तेलाचा एकही थेंन न वापरता सोप्या रेसिपी कशा बनवायच्या हे थोडक्यात पाहूया.

आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांनी घेरले आहे. ज्याचं मुख्य कारण म्हणजे जंकफूडचे जास्त प्रमाण हे आहे. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाबासारखे आजार आजकाल तरुणवर्गात अनेकांना जडत आहेत. ज्यामुळे अनेक लोक हे आता निरोगी जीवनशैलीकडे वळताना दिसत आहेत. एकीकडे कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण आणि हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे. तिथे पर्याय म्हणून हेल्दी किंवा तेलविरहित नाश्ता करण्याकडे आजकाल सगळ्यांचा कल आहे. आज आपण तेलाचा एकही थेंब न वापरता सोप्या रेसिपी कशा बनवायच्या हे थोडक्यात पाहूया.

तेल नसलेल्या नाश्त्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य तर सुधारतेच पण लठ्ठपणाही कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही ओट्सचा उपमा बनवून खाऊ शकता. ओट्सचा उपमा बनवण्यासाठी गरम पाण्यात ओट्स टाकून त्यात कांदा आणि टोमॅटोसह तुमच्या आवडत्या भाज्या घालू शकता. यानंतर ५ ते १० मिनिटे शिजल्यावर त्यात तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून अजून थोडा वेळ शिजवून घ्या. तेलाशिवाय बनवलेला हा ओट्स उपमा तुम्हाला नक्की आवडेल.

तुम्हाला जर पौष्टिक नाश्त्याबरोबर चविष्ट खाण्याची इच्छा असेल तर पनीर कॉर्न सलाड ही देखील उत्तम डिश आहे. यासाठी तुम्हला एक नॉन स्टिक पॅन घेऊन त्यात पनीरचे तुकडे सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कॉर्न घालून मिक्स करा. आपल्या आवडीनुसार त्यात मसाले घालू शकतो. नंतर त्यात वरून चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस घालून खाऊ शकता.

तेलाचा वापर न करता बटाट्याची पोळी बनवण्यासाठी तुम्हला प्रथम बटाटा उकडून घ्यावा लागेल. नंतर तो बारीक करून त्यात तुमच्या आवडीचे मसाले त्यात घालू शकतो. यांनतर त्यात पीठ मिक्स करून ते हलक्या हाताने मळून घ्या आणि त्यापासून बनवलेल्या पोळ्या तव्यावर भाजून घ्या. विशेष म्हणजे या पोळ्या खाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही भाजीचीही गरज नाही. ही पोळी दही किंवा चटणीसोबत त्याची चव चविष्ट लागते.

हे ही वाचा:

झाकलेली मुठ उघडायला लावू नका नाहीतर Sharad Pawar यांना त्रास होईल: Chitra Wagh

स्वतंत्रदिनाच्या या खास दिवशी ‘हे’ तिरंगी दागिने देतील एक स्पेशल लूक…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss