spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हृदयाच्या समस्यांवर दुर्लक्ष करू नका, वेळीच ओळखा ‘ही’ लक्षणे

ही गंभीर बाब लक्षात घेता, तुमचं हृदय कमजोर असल्याची नेमकी लक्षणं काय हे आपण आज जाणून घेणार आहोत. 

आजकाल जलद गतीने बदलणारी लाईफस्टाईल आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपलं हृदय कमजोर होत आहे. असं झालं की शरीरात वेगवेगळी लक्षणं दिसतात. ज्यांकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. आजकाल आपल्या आसपास हार्ट च्या समस्यांनी त्रस्त अनेक रुग्ण आपण पाहतो. हल्ली जगभरात हृदयाच्या समस्यांमुळे लोकांच्या मृत्युमध्ये ही अगणित वाढ होत चालली आहे. 35 ते 40 वयातील लोकही हार्ट अटॅक ने मृत्यूमुखी पडत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेता, तुमचं हृदय कमजोर असल्याची नेमकी लक्षणं काय हे आपण आज जाणून घेणार आहोत.
१. श्वसनाचा त्रास – श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हाही हृदय कमजोर झाल्याचा संकेत आहे. हृदय कमजोर झालं की, श्वास घेण्यास त्रास सुरू होतो. अशात वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
२. छातीत जळजळ – हृदय कमजोर झाल्यावर शरीरात वेगवेगळी लक्षणं दिसतात. सुरूवातील जेव्हा हृदय कमजोर होतं तेव्हा व्यक्तीला सतत मळमळीची समस्या होते. त्यासोबतच छातीत सतत जळजळ होऊ लागते. जर तुम्हाला या समस्या जाणवत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
३. सतत सर्दी-खोकला –
हल्ली बदलत्या वातावरणामुळे अनेकांना वरचेवर सर्दी खोकला सुरु असतो. पण हे जास्त झाले तर अंगावर न काढता सर्वात आधी डॉक्टर कडे जाऊन योग्य ती तपासणी करून घ्या. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, सावध होऊन वेळीच उपचार करा.
४. हाय ब्लड प्रेशर – हृदय कमजोर झाल्यावर तुमचं ब्लड प्रेशर अनियंत्रित होतं. हृदय कमजोर झालं की, हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढली की, हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अशात नेहमीच ब्लड प्रेशर चेक करत रहावं.

Latest Posts

Don't Miss