Sunday, June 30, 2024

Latest Posts

उभं राहीलं की टाचा ठणकतात…’या’ पाच उपायांनी वेदना होतील कमी

आपल्याला काही आजार हे सुरुवातीला अगदीच चुटे समजतो. पण ते पुढे जाऊन प्रचंड त्रासदायक ठरू शकतात. यासाठी स्वतः कडे लक्ष देणं फार गरजेचे आहे. 

मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा आपण आपल्याकडे लक्ष देणे कमी करतो. याचा परिणाम हा फार दूरगामी होतो. या दैनंदिन जीवनात स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला काही आजार हे सुरुवातीला अगदीच चुटे समजतो. पण ते पुढे जाऊन प्रचंड त्रासदायक ठरू शकतात. यासाठी स्वतः कडे लक्ष देणं फार गरजेचे आहे.

आपण दिवसभर ज्या पायांवर उभे असतो ते पाय मजबूत आणि कणखर असणं गरजेचं असतं. मात्र कधी आपल्या पोटऱ्या दुखतात तर कधी गुडघे. मात्र टाचदुखी (Heels stiff) ही तर बहुतांश महिलांमध्ये अतिशय सामान्य समस्या असल्याचे दिसते. टाचा दुखल्या तरी आपण त्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. पण कालांतराने ही समस्या मोठी होत जाते आणि आपले जगणे अवघड करते. दिवसभर उभे राहून काम करताना किंवा घरात, बाहेर वावरताना आपल्याला हे लक्षात येत नाही. मात्र अनेकदा सकाळी उठल्यावर आपल्याला टाच किंवा पाय जमिनीवर टेकवताच येत नाही. बरेच दिवस आपण हे दुखणे अंगावर काढतो, मात्र कालांतराने हा त्रास वाढत जातो. पूर्वी टाचदुखीची समस्या वयाच्या चाळीशीनंतर सुरू व्हायची मात्र आता अगदी लहान वयातील मुलींनाही टाचदुखीचा त्रास उद्भवतो. यामागील कारणे काय आणि त्यावर कोणते उपाय केल्यास आराम मिळू शकतो याविषयी आपण जाणून घेऊयात.

उभं राहीलं की टाचा ठणकतात याची नेमकी करणे काय ?

१. वाढतं वजन…
आपल्या वजनाचा पूर्ण भार आपल्या शरीरावर येत असतो. त्यामुळे वजन सतत वाढत असेल तर त्यामुळे टाचा दुखू शकतात. यासाठी व्यायाम, आहार यांचा योग्य प्रकारे अवलंब करुन वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते.

२. चपला किंवा बूट…
आपल्या चपलांचा साईज चुकीचा असेल तरी टाचांना त्याचा त्रास होतो. इतकेच नाही तर चपलांचे सोल चांगल्या दर्जाचे नसेल, खूप मोठ्या हिल्स सतत घालत असू तरी पाय आणि टाचा दुखण्याचे प्रमाण वाढते. यासाठी योग्य मापाच्या, चांगल्या दर्जाच्या चपला वापरायला हव्यात.

३. कामाचे स्वरुप...
सतत उभं राहायचे काम असेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त चालावे लागत असेल तरी पाय आणि टाचा दुखू शकतात. त्यामुळे आपले कामाचे स्वरुप लक्षात घेऊन त्यानुसार योग्य त्या गोष्टी करणे आवश्यक असते.

उभं राहीलं की टाचा ठणकतात यावर उपाय काय ?

  • रात्री झोपताना टाचांना बर्फाने शेकणे हा सर्वात सोपा उपाय आहे. यामुळे टाचेच्या आतल्या स्नायूंना आराम मिळून टाचदुखी काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.
  • टाचांना तेलाने मसाज केल्यासही चांगला आराम मिळू शकतो. त्यामुळे टाचांना नियमितपणे शक्य तेव्हा तेल कोमट करुन मसाज करायला हवा. यासाठी मोहरीचं तेल वापरलं तरी चांगला फायदा होतो.
  • गरम पाण्यात मीठ घालून त्यामध्ये टाचा बुडवून ठेवल्यास त्याचाही टाचदुखी कमी होण्यास फायदा होतो.
  • आंबेहळद हा आयुर्वेदातील (Ayurvedic medicine) अतिशय उपयुक्त घटक असून दुखणाऱ्या टाचांना या आंबेहळदीचा लेप लावल्यास त्याचाही चांगला फायदा होतो.
  • आहारात कॅल्शियम (Calcium), व्हिटॅमिन्स (vitamin), खनिजे या सगळ्या गोष्टींचे प्रमाण चांगले असेल यासाठी प्रयत्न करा. रात्रीच्या वेळी हलका आहार घेणे, आंबवलेले किंवा आंबट पदार्थ कमी खाणे हाही चांगला उपाय आहे.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss