Hill Station : हनीमूनला जाण्याचा प्लॅन करताय ? तर या ठिकाण्याचा नक्की विचार करा

Hill Station : हनीमूनला जाण्याचा प्लॅन करताय ? तर या ठिकाण्याचा नक्की विचार करा

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्नानंतर जोडप्यांमध्ये फिरायला जाण्याची खूप उत्सुकता असते. प्रत्येक कपल आपल्या हनीमूचे स्वप्न रंगवत असते. काही कपल तर लग्नाच्या अगोदर हनीमून साठी कोणत्या ठिकाणी जायचे या गोष्टीचा विचार करत असतात. त्यामुळे हनीमूनला कोणत्या ठिकाणी जायचे हा प्रश्न पडतो ? तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून हनीमून साठी काही ठिकाणयां बद्दल सांगणार आहोत.

मसुरी ( (Mussoorie) :

उत्तराखंडातील मसुरी (Mussoorie Hill Station) हनीमूनसाठी खूप प्रसिद्ध आहे. तसेच मसुरीला उत्तराखंडाची राणी म्ह्णून ओळखले जाते. हिमालयाच्या टेकडीच्या काठावर हिरवेगार जंगलांनी वसलेले असे मसुरी शहर आहे. मसुरी या शहरामध्ये भरपूर प्रेक्षणीय स्थळे आहेत. मसुरीमध्ये गेल्यावर आलिशान रिसॉर्ट्समध्ये राहू शकता, त्याच बरोबर तुम्ही कॉफीचा आस्वाद घेऊ शकता, झारीपानी फॉल्स, कॅमल बॅक रोडला भेट देऊ शकता.

नैनिताल (Nainital) :

उत्तराखंडामध्ये असलेले नैनिताल (Nainital) हे ठिकाण सर्वाना आवडते. तसेच हनीमूनसाठी नैनिताल हे ठिकाण खूप सुंदर आहे. नैनितालमधील तलावात बोटिंग देखील तुम्ही करू शकता. नैनितालची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे १९३८ मीटर आहे. नैनिताल मध्ये भरपूर सुंदर आणि लक्ष वेधून टाकणारी पर्यटन स्थळे आहेत. त्याच बरोबर तुम्ही स्नो व्ह्यू पॉइंट (Snow View Point) रोपवे, या ठिकाणी भेट देऊ शकता. तसेच हनीमून साठी नैनी रिट्रीट (Naini Retreat) म्हणून हॉटेल खूप प्रसिद्ध आहे.

 

मनाली (Manali) :

मनाली हे हिल स्टेशन भारतात खूप प्रसिद्द आहे. तसेच मनाली ट्रेकिंग, खरेदी, पॅराग्लायडिंग, पक्षी निरीक्षण, नदी राफ्टिंग यासाठी देखील खूप प्रसिद्द आहे. मनाली या हिल स्टेशनला अनेक जोडपे लग्नानंतर जातात. जर तुम्हाला मनाली मध्ये फिरायला जायचे असेल तर तुम्ही डिसेंबर ते फेब्रुवारी या मध्ये तुम्ही जाऊ शकता.

श्रीनगर (Srinagar) :

लग्नानंतर हनीमूनला जाण्याचा विचार करताय तर जम्मू काश्मीरला जाण्याचा विचार नक्की करा. जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. हनिमूनर्सनी (Honeymooners) या ठिकाणी नक्की भेट दिली पाहिजे. तसेच शालिमार बाग, निशात यांसारख्या मॅनिक्युअर केलेल्या ऐतिहासिक बागांच्या बाजूने तुम्ही फेरफटका देखील मारू शकता.

हे ही वाचा : थंडीच्या दिवसात मुलांना द्या ‘हे’ पदार्थ….

 

Exit mobile version