डोकेदुखीवर घरगुती उपाय

डोकेदुखीवर घरगुती उपाय

डोकेदुखी ही सर्वांना होणारी समस्या आहे. आजकालच्या धावपळीमुळे आपल्याला आरोग्यावर लक्ष देता येत नाही. जास्त प्रमाणात ताणतणावाची समस्या वाढली तर डोकेदुखी वाढते. डोकेदुखीचे बरेच कारणे असू शकता. डोळ्यांची समस्या, अपचन, ऊन लागणे, अनियमित मासिक धर्म, ताप , इत्यादी. काही लोकांना मायग्रेनचा त्रास असतो त्यामुळे पण डोकेदुखी होते. डोकेदुखी असल्यास आपले कामात लक्ष लागत नाही. चिडचिड होणे, कामामध्ये लक्ष न लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. काही लोक डोकेदुखी असल्यास मेडिकलमध्ये जाऊन औषधे आणतात तरीपण डोकेदुखी कमी होत नाही. तर आज जाणून घेऊया डोकेदुखीवर घरगुती उपाय.

हे ही वाचा: सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका का येतो ? जाणून घ्या कारणे

 

एका ग्लासमध्ये गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायला पाहिजे. जर गॅसमुळे डोकं दुखत असेल तर लगेचच आराम मिळेल.

डोकेदुखी असल्यास लवंगात थोडे मीठ मिसळून घेणे आणि दुधामध्ये मिक्सकरून पिणे यामुळे डोकेदुखी कमी होते.

सर्दीमुळे होणार्‍या डोकेदुखीत धणेपूड आणि साखरेचा घोळ तयार करून त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.

डोकेदुखी जास्त असल्यास भरपूर प्रमाणात पाणी पिणे. त्यामुळे डोकेदुखी कमी करण्यास मदत होते.

डोकेदुखी कमी करण्यासाठी रात्रभर बदाम भिजून ठेवणे आणि सकाळी उठल्यावर बारीक करून घेणे आणि त्यात थोडे तूप मिक्सकरून करून घेणे आणि पेस्ट डोक्याला लावणे.

खोबरेल तेलाने १०-१५ मिनिटे डोक्यावर मालिश केल्याने डोकेदुखी कमी होते.

 

कच्चा लसूण बारीक करून डोक्याला लावल्यास डोकेदुखी थांबते.

डोकेदुखी असताना तुम्ही आल्याचा चहा करून देखील पिऊ शकता.

तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.

डोकेदुखी असल्यास पाणी आणि फळे खा. जसे की कलिंगड , द्राक्षे इत्यादी.

हे ही वाचा:

हिवाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

 

Exit mobile version