ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

चेहऱ्यावरील सौंदर्य जपण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. चेहऱ्यावरील महत्वाचा भाग म्हणजे ओठ. ओठ जर काळे पडले तर आपले चेहऱ्यावरील सौंदर्य कमी होते. व आपण यासाठी भरपूर औषध आणि काही उपाय करत असतो. ओठ काळी पडण्याची अनेक कारणे असू शकतात. ओठ काळे का पडतात हे आधी जाणून घेतले पाहिजे. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी अनेक उपाय आहेत.

हे ही वाचा : ८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

 

ओठ काळे पडण्याचे कारणे –

उन्हात फिरताना त्वचेची काळजी घेतो पण ओठांची घेत नाही. त्यामुळे ओठ काळी पडू शकतात.

तुम्हाला जर गुलाबी ओठ पाहिजे असेल तर तुम्ही कॉफीचे सेवन कमी करा. कॉफीचा सेवन मुळे ओठ काळी पडू शकता.

ओठांवर सतत लिपस्टिक लावून ठेवल्यास ओठ काळे पडतात. आणि ओठांवर डाग उठतात.

जर तुम्ही (expairy date) गेलेली लिपस्टिकचा वापर करत असाल तर त्यामुळे तुमचे ओठ देखील काळे पडू शकतात.

तुम्हाला काही गोष्टीची ऍलर्जी असेल तर त्यामुळे देखील ओठ काळे पडू शकतील.

 

घरगुती उपाय –

बीटापासून रस काढून घेणे आणि तो ओठांना लावणे. किंवा बीटाचा रसामध्ये तुम्ही थोडे मध देखील मिक्सकरून लावू शकता.

ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब ओठांना लावणे त्यामुळे तुमचा ओठांचा काळेपणा कमी होईल. ऑलिव्ह ऑईलमुळे तुमचे ओठ मुलायम होतील.

लिंबाच्या रसाचे २-३ थेंब ओठांना लावून मसाज करावा.

रात्री झोपण्यापूर्वी तिळ्याच्या तेलाचे काही थेंब तुम्ही तुमच्या ओठाला लावा. त्यामुळे तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत होते.

गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि थोडे दूध घ्या आणि दुधात गुलाबाच्या पाकळ्या वाटून ओठांना लावा त्यामुळे तुमच्या ओठांचा काळेपणा कमी होईल आणि ओठ गुलाबी होतील.

हे ही वाचा :

दुधी भोपळ्यापेक्षाही फायदेशीर आहेत त्याची साल, जाणून घ्या फायदे

 

Exit mobile version