spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन करावे

मधामध्ये अनेक पोषक घटक असतात . मधाचे अनेक फायदे आहेत . मधामध्ये कॉपर, आयर्न (लोह), फॉस्फोरस, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम सारखी तत्वे असतात. मध (honey) हा अतिशय चविष्ट असतो आणि मधुर साखरेसारखा असतो . मधाचे अनेक प्रकारे सेवन केले जाते . मधामध्ये लिंबू मिसळल्याने वजन कमी करण्यास मदत होते . तसेच मध त्वचेसाठी देखील चांगले आहे . मधाचे सेवन केल्यास अनेक आरोग्याच्या समस्या कमी होतात . रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन करणे आरोगासाठी चांगले असते .

हे ही वाचा : शांत झोप लागण्यासाठी करा हे उपाय

 

मधात ॲंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात . त्यामुळे कफ दूर होण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध पाण्यासोबत सेवन करावे .

मधामुळे संसर्गापासून बचाव होतो. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते .

मधामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन करू शकता. मध आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे काम करते . यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते. तसेच तुमचा त्वचेचा रंग देखील उजळतो .

घश्यातील खवखव कमी करण्यासाठी मधासोबत आल्याचा रस मिक्सकरून त्याचे सेवन करू शकता . आणि घश्यातील खवखव कमी होते .

मधामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह मधाचे सेवन तुम्ही करू शकता. त्यामुळे चरबी कमी होते. अशा प्रकारे मधाचे सेवन केल्यास जलदरित्या वजन कमी होण्यास मदत होते.

 

सर्दी-खोकल्याच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी मध असलेल्या दुधाचे सेवन हा रामबाण उपाय मानलो जातो. सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी अशा दुधाचे सेवन करावे.

हृदय विकारांपासून दूर राहण्यासाठी दुधामध्ये मध घालून सेवन करा. तसेच आपण एक ग्लास गरम पाण्यामध्ये मधाचा समावेश करा आणि हे मिश्रण प्या. मधामध्ये फेनोलिक कम्पाउंड भरपूर प्रमाणात असते. जे नैसर्गिक स्वरुपात अँटी-ऑक्सिडेंट स्वरुपात कार्य करते. हा घटक हृदय विकार असणाऱ्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर असतो.

दुधामध्ये मध घालून सेवन केल्याने आपला शारीरिक ताण कमी होतो. कारण यामध्ये औषधी गुणधर्मांचा समावेश आहे. यामुळे रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये मध घालून सेवन करा.

हे ही वाचा :

चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे तर, हा उपाय नक्की करून पहा

 

Latest Posts

Don't Miss