कर्जाचे किती प्रकार आहेत ? जाणून घ्या

कर्जाचे किती प्रकार आहेत ? जाणून घ्या

काही लोक त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी लोन घेत असतात . हे कर्ज बँक मधून किंवा काही आर्थिक संस्थेकडून घेत असतात . कर्जाची रक्कम त्याच्या व्याजासोबत द्यायची असते . शॉर्ट टर्म लोन , मिडियम टर्म लोन असे देखील प्रकार असतात . कर्ज जर वेळेवर पूर्ण न झाल्यास आपल्याला काही गोष्टीसाठी सामोरे जावे लागते . त्यासाठी कर्ज वेळेवर फेडले गेले पाहिजे . आज आम्ही तुम्हाला कर्जाचे काही प्रकार सांगणार आहोत . तर ते पुढील प्रमाणे .

हे ही वाचा : नितळ त्वचेसाठी बनवा फुलांचा फेस पॅक

 

कर्जाचे प्रकार –

शॉर्ट टर्म लोन – शॉर्ट टर्म लोन मध्ये कर्ज परत फेडण्यासाठी एक वर्षाहून कमी कालावधी दिलेला असतो.

लॉंग टर्म लोन – लॉंग टर्म लोन मध्ये कर्ज परत फेडण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी असतो .

मिडियम टर्म लोन – या प्रकारचे कर्ज परत फेडण्यासाठी १ वर्ष ते ३ वर्षांचा कालावधी असतो .

पर्सनल लोन – पर्सनल लोन घेण्यासाठी बँकेच्या खूप अटी असतात . पर्सनल लोन मध्ये HOME LOAN , AUTO LOAN असे देखील प्रकार असतात . बँक जेव्हा पर्सनल लोन देते त्यावेळी कर्ज घेत असलेल्या व्यक्तीची म्हणजे कर्ज परत फेडण्याची क्षमता आहे की नाही हे बघून त्यांना कर्ज दिले जाते .

 

पर्सनल लोन घेण्यासाठी कागद पत्रे –

आधार कार्ड

पेनकार्ड

पासपोर्ट

ड्रायविंग लायसन्स

सहा महिन्याची पगार स्लिप

तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट

कंपनीचे लेटर

२ पासपोर्ट साईझ फोटो

घराचे कागदपत्रे

लाइटबिल

गोल्ड लोन – जर बचत कमी करत पडत असेल तर सामान्य माणूस गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असतात . सोने खरेदी ही फक्त आपली हौस नाही तर एक इंवेस्टमेंट म्हणून ही आपण करतो. मुलींच्या विवाहाच्या वेळी स्त्रीधन म्हणून शक्यतो सोनेच दिले जाते कारण अडीअडचणीच्या वेळी हेच सोनं गहाण ठेवून आपण कर्ज घेवू शकतो. सोन असल्यास आपल्याला गरजेचा वेळी त्याचा फायदा होतो. गोल्ड लोन मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही बँकेकडे जाता तेव्हा तिथे तुमच्या सोन्याची शुद्धता तपासली जाते . सोने चेक करण्यासाठी सोनाऱ्याकडे दिले जाते. सोन्याचे आधी वजन चेक केले जाते. मग सोने किती शुद्ध आहे हे सांगण्यात येते . दागिन्यांच्या वजनातून त्यात असलेले खडे, लाख वगैरेंचे वजन वजा करून फक्त सोन्याचे वजन काढले जाते. हे झाले नेट वेट. हे साधारण मूळ वजनाच्या ३० ते ४०% कमी होते. याच वजनावर आपल्याला कर्ज दिले जाते.

प्रॉपर्टी लोन – प्रॉपर्टी लोन मध्ये तुम्ही तुमच्या संपत्तीचे कागदपत्रे बँकेकडे गहाण ठेवत असतात. हे लोन एखाद्याला जास्तीत जास्त १५ वर्षांसाठी मिळू शकते. तुमच्या संपत्तीच्या ३०% ते ५०% रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून मिळत असते.

होम लोन – घर खरेदी करण्यासाठी जे कर्ज घेतले जाते त्याला होम लोन किंवा गृह कर्ज असे म्हणतात. तुम्ही फक्त घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेत नसतात तर तुम्ही तुमचे घर बनवायला लागणारी रक्कम, त्यासाठी रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी चा खर्च आणि इतर देखील अनेक खर्च एकत्र करून मग बँकेकडून लोन घेत असता. बँक तुमचे घर बांधण्याच्या एकूण खर्चाच्या ७५% ते ८५% पर्यंत लोन देते. बाकी पैशांची गुंतवणूक तुम्हाला स्वतःलाच करावी लागते.

हे ही वाचा :

ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यासाठी प्या ही ३ पेय, दिसाल फ्रेश

 

 

Exit mobile version