सुंदर आणि नाजूक डोळ्यांसाठी काजळ लावण्याच्या पध्दती

सुंदर आणि नाजूक डोळ्यांसाठी काजळ लावण्याच्या पध्दती

डोळे सुंदर दिसण्याची जबाबदारी ही काजळास दिली आहे. काजळ लावल्यावर डोळ्यांना एक वेगळी सुंदरता मिळते. काजळ लावल्यास डोळ्याला आराम मिळतो. थंड वाटते. डोळे सुंदर दिसण्यासाठी काजळ सोबत डोळ्यांना मस्करा ही लावला जातो. तसेच आता सणांचा मेळावा चालू आहे. प्रत्येक सणांमध्ये आपण सुंदर आणि मस्त दिसावे असे महिलांना वाटत असते. सणांमध्ये महिलांना वेगवेगळा लूक पाहिजे असतो आणि महिला त्याचप्रमाणे खरेदी करत असतात. मात्र बहुतांशवेळा मेकअप एकच असतो. हा मेकअप थोडा बोल्ड दिसावा यासाठी आम्ही तुम्हाला टिप्स सांगणार आहोत. तुमच्या लूकला आणखी सुंदर बनवण्यासाठी डोळ्यांसाठी काजळ मदत करते.

हे ही वाचा :

लहान मुलांचे मन का जपले पाहिजे ?

काजळ हिरव्या, पांढऱ्या आणि वेगवगेळ्या रंगाचे असते. काही महिला काजळ आपल्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग होईल अश्याप्रकारे देखील लावतात. त्यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारचा वेगळा लूक येतो. काजळसोबत डोळ्यांना आपण लूक देण्यासाठी आयलायनरचा वापर करू शकतो. डोळ्यात काजळ लावल्यास डोळ्यांचा पापणीवर आपण पांढरे आयलायनर देखील लावू शकतो.

काजळ तुम्ही पारंपरिक आणि वेस्टर्न अशा लूकसोबत ही लावू शकता. काजळ ब्रशने देखील लावू शकता आणि हिरव्या पांढऱ्या असा प्रकारचे काजळ तुम्ही वापरू शकता. जेल काजल, पेन्सिल काजल, स्टिक काजल देखील वापरु शकता.

 

चेहऱ्यावर अजून ग्लो दिसण्यासाठी तुम्ही काजळ सोबत डोळ्यांना मस्कारा देखील लावू शकता. पण थोडावेळ तुम्हाला जळजळ होईल, परंतु काही काळानंतर तुम्हाला खूप आराम मिळेल. काजळाप्रमाणे, सुरमा तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध नाही. आपण तो फक्त पावडर स्वरूपात खरेदी करू शकता. सुरमा काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे मिळतात.

काळे काजळ डोळ्यांना लावल्यास एका प्रकारे क्लासिक लूक येतो. पारंपारिक पोशाख आणि चांदीच्या दागिन्यांसह काजळाचा हा प्रकार अनेक तरुणी सध्या वापरतात.

काजळ लावल्यास ताजेतवाने वाटे. आणि काजळ लावल्यामुळे डोळ्यांच्या बाहेरील धुळीपासून संरक्षण करते.

हे ही वाचा :

त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी द्राक्षे तेलाचे फायदे

Exit mobile version