केशर विकत घेताय? भेसळयुक्त केशर ओळखणार कसं? करा हे उपाय

अनेकदा आपण केशर जेवणासोबत चेहऱ्याच्या समस्यांवर देखील वापरतो. अशावेळी तुम्हाला योग्य गोष्टी निवडताना मदत झाली पाहिजे.

केशर विकत घेताय? भेसळयुक्त केशर ओळखणार कसं? करा हे उपाय

भेसळयुक्त केशर ओळखणार कसं? करा हे उपाय

आजकाल बाजारात अनेक भेसळयुक्त गोष्टी उपलब्ध आहेत. ज्याचा वापर किंवा सेवन केल्याने आरोग्याला हानी पोहोचते. त्याचबरोबर शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. अनेकदा आपण केशर जेवणासोबत चेहऱ्याच्या समस्यांवर देखील वापरतो. अशावेळी तुम्हाला योग्य गोष्टी निवडताना मदत झाली पाहिजे. आज आपण बाजारात मिळणाऱ्या केशर खरं की खोटं हे कसं ओळखायचं ते पाहणार आहोत. जे केशर भेसळयुक्त असते ते स्वस्त दरात बाजारात मिळते. त्यामुळे अनेक जण किंमत बघून केशर खरेदी करतात. आजकाल बाजारात हमखास खरं आणि भेसळयुक्त केशर उपलब्ध झालं आहे. अशावेळी तुम्हाला ही खरं केशर कोणतं हे ओळखता यायला पाहिजे. आज आपण पाहणार आहेत भेसळयुक्त केशर ओळखण्याची सोप्पी पद्धत. चला तर मग पाहुयात. How To Check Adulteration In Saffron

 


चवीने ओळखा
केशर खरेदी करायला गेल्यावर आधी केशर चाखून पहा. केशरचे दोन तुकडे करून जिभेवर ठेवा आणि हलकेच चावा. चघळताना थोडा कडवटपणा आला तर समजून घ्या की हेच खरे केशर आहे.

 


बेकिंग सोडा
बेकिंग सोडा वापरूनही खरा केशर ओळखता येतो. अशा वेळी एका भांड्यात बेकिंग सोडा विरघळवून त्यात केशरचे दोन तुकडे टाका. जर केशराने पाण्यात लाल रंग सोडला तर ते खोटे केशर आहे आणि पिवळा रंग सोडल्यास ते खरे केशर आहे असे समजावे.

 

सुगंध
केशराच्या वासावरूनही खरा केशर ओळखता येतो. अशा वेळी तुम्ही लक्षात घ्या की वास जर विचित्र आणि कडू असेल तर ते भेसळयुक्त आहे. आणि जर सुगंध थोडा मोहक असेल तर तेच खरं केशर आहे.

Exit mobile version